Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत तेरावा प्रसंग प्रारंभ. परी वर्णिली हो यथासांग येथे । परी पाहतां दीसते अल्प तेथे ॥ मनी संशयो श्रोतयां प्राप्त जाला । प्रतीउत्सरे काय दिल्ही तयांला ।। १ ।। अयोध्यापुरी स्वर्गलोकासि गेली । पढे वोस होतां चि ते भग्न जाली ।। असेना जना राहणे वस्ति जेथे । खडे माणिके कोण ठेवील तेथें ।। २ ।। पुरे पट्टणे वोस होती कितेके । पुढे पाहतां दीसती सर्व टेके ॥ युगें लोटतां ही वसे अल्प कांहीं । असंभाव्य हे तूं विचारूनि पाहीं ॥ ३ ॥ असो तूटला संशयो श्रोतयांचा । पुढे राहिला वोध जातां कथेचा ।। अयोध्यापुरा चालिले वीर जेठी । निघाले स्वये भार कोट्यानकोटी ।। ४ ।। ऋषी राम ते चालिले नीज भारे । दळे चालिली पृष्टभागी अपार ।। शिबीका पुढे चालती दिव्य हारी । सखे लोक बंधू मधे रोवणारी ।। ५ ॥ पुढे दाटले भार महारथांचे । दळी घोष जाले गजां घोडियांचे ।। गिरीतुल्य सेना रिसांवानरांची । बहू दाटि राक्षेस लंकापतीची ।। ६ ।। पुरी पावतां रुंधल्या सर्व वाटा । असंभाव्य तो आहला दाट खेटा ।। शतांची शते धांवती वेत्रधारी | दळे माजली कोण कोणास वारी ॥ ७ ॥ कितीएक ग्रामस्थ मध्ये चि गेले । कितीएक ते चूकले भ्रांत जाले । अयोध्यापुरीमामि ऊभी अचाटें । गहें गोरे पाहती दाट थाटे ॥ ८ ॥ करी रत्नताटे कितीएक हारी । असंभाव्य त्या चालिल्या दिव्य नारी ।। बहसाल नीराजनें लक्ष कोटी । पुरींतूनि येतां पुढे थोर दाटी ।। ९॥ रुपे राजसा सुंदरा त्या प्रितीने । रघनाथ ओवाळिती आवडीनें ॥ मनामाजि ते लागलीसे अवस्था । सखे पाहती येकपत्नीव्रतस्था ।। १० ।। करीती बहू सुंदरा अक्षवाणे । कितीएक ओवाळिती निंबलोणे ॥ असंभाव्य "थोवे तया नायकांचे । मखें गर्जती भाट वेतीळ वाचे ॥ ११ ॥ पताका निशाणे बहूरंग वर्णं । महातेजपंजाळ मोतंडपणे ॥ वरी दाटली ती असंभाव्य छत्रे । भ्रमों लागली दिव्य छत्रे विचित्रे ।। १२ ॥ पहा हो पहा पैल तो राम आला । असंभाव्य हा वीर मेळा मिळाला । दिसेना पुढे पाहतां गर्द जाला । समस्ती करें ताळिकाघोष केला ॥ १३ ॥ पुढे सर्व ही भूवनामाजि गेले | महावीर ते बैसले स्वस्थ जाले । पुरीमाजि आनंद सर्वांस जाला । उभे राहिले भाग्य हे राम आला ।। १४ । । ४९. रावणारी राम. ५०. वेत्रधारी-छडीदार, चोपदार. ५१. थोवे थवे. ५२. वेताळ= स्तुतिपाठक ( सं. वैतालिक ). ५३. मार्तड पण छत्रया.