Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युद्धकांड. पुढे ब्राह्मणी मांडिली धर्मचर्चा | मुखे बोलती धन्य दीनू सुवाचा ॥ ६२ ॥ पुढे दीन तो चालिला अस्तमाना । नमायासि आली असंभाव्य सेना ॥ कितीएक ती दीवट्यांची अचाटें । सभामंडपी चालली दाट याटें ॥ ६३ ॥ प्रसंगी तये वाद्यकल्लोळ जाला । दुरस्ता बह लोक सूखे मिळाला ।। विराजे सभेमाजि तो रामराजा । पुढे चालिल्या त्या कळावंत-फौजा ॥ ६४ ॥ झणाणीत वीणे मनोरम्य नाद । दणाणीत मुदंग गंभीर शब्दे ॥ अला कळा दाविती रागमाळा । सुरे सुस्वरे माजली रंगवेळा ।। ६५ ।। बहू ताळ कल्लोळ वाजे खणाणां । विणे वाजती तंतुनादे झणाणा | बहू गीत संगीत ते कूसरीची । भले जाणती ते घडी अमृताची ।। ६६ ।। असंभाव्य तो नृत्यकल्लोळ जाला । सुखे पाहतां शुद्धि नाही जनांला ।।। गुणी रातले मातले गायनाने । तदाकार ते वस्ति केली मनाने ।। ६७ ।। अळंकार चीरे पुढे ढीग केले । कळावंत ते सर्व संतुष्ट जाले ।। विसर्जी सभा तो पुढे रामराजा । निरोपे चि गेल्या बहू लोकफौजा ॥ ६८ ॥ समस्ती घडी एक विश्रांति केली । अकस्मात प्रामात ते प्राप्त जाली ।। पढ़ें सारिते जाहले नित्य नेमें । महा वीर ते आपुलाल्या स्वधर्मे ।।६९ ।। समे बैसिजे स्वामि देवाधिदेवें । म्हणे आजि वेगीं अयोध्यसि जावे ॥ परी सर्व शंगारमंडीत केली । असंभाव्य ते सर्व सेना निघाली ॥ ७० ॥ महीमंडळी मुख्य आधी पराणी । मखे बोलिजे ते रवीवशखाणा ॥ अयोध्यापरी धन्य हा पण्यराशी । किती राहिले तापसी ताथवासा ।। ७१ ।। मनी संत योगी सदा वीतरागी । उदासीन साधू पराचे विभागा ॥ ऋषीमंडळी सात्विकां सज्जनांची । महा योगि व्यत्पन्न विद्वज्जनाचा ॥ ७२ ॥ कितीएक ते मंडळी प्रेमळांची। कितीएक ते ब्राह्मणां साशळाचा ॥ मनस्वी किती ते यती ब्रह्मचारी | बहतां परीचे बहू वषधारा ।। ७२ ।। सदा सर्वदां योग ध्यानस्थ जाले । कितीएक ते काळ घान गल ॥ भुयारे मठ्या त्या बहुतां परीच्या । नदीचे तिरी पर्णशाला मठाच्या ।। ७४ ।। प्रभू देव हा सर्व ब्रह्मादिकांचा । जया वर्णितां शीणल्या वेदवाचा ।। स्वये वास जेथे जगन्नायकाचा । महीमा वदे कोण त्या हो स्थळाचा ।। ७५ ॥ कितीएक ते राहिले भक्त ज्ञानी । कृपाळ बह मुख्य नामाभिधानी ।। बहू सूकृती सूर्य जैसे तपाचे । सदा धर्मचर्चा अखंडीत वाचे ।। ७६ ।। नदी चालिली भव्य ते पर्णतोया । जनालागि आधार आली उपाया ।। शिवाल्ये बह बांधिली थोरथोरे । ध्वजा देउळे शीखरे ती अपारे ।। ७७ ।। १३. कळावंत फौजा कळवांतणींचे ताफे.