Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टाजूट का पतली पुष्पाजाले । म युद्धकांड. वरी कंकणे मुद्रिका चापपाणी । ब्रिदे घातली अँर्दु वांकी झणाणी ।। महीमंडळी सर्व ही एक जाले । रघुनायका भव्य लावण्य आले ॥ ३३ ॥ पहातां नसे तूळणा ही तुळाया । विराज बहू भूषणे दिव्य काया ॥ ऋषीराज बंधू सखे आणि माता । सुखे पाहती राम हा सौख्यदाता ॥ ३४ ॥ प्रितीने मखे बोलता राम जाला । म्हणे स्नान कीजे तया बांधवाला ॥ स्नेहे उत्तरे बोलतां शीघ्र तैसें । किजे मंगळस्नान नाना विलासें ॥ ३५ ॥ जटाजट ते मोकळे सर्व केले | मळे त्यागिले भव्य सुस्नात जाले ।। सुगंधे उटी घेतली पुष्पमाळा । अलंकार दिव्यांबरे रत्नमाळा ।। ३६ ॥ प्रसंगे समस्तांसि अभ्यंग जाले । सभोते सखे आप्त सर्वे मिळाले ।। अळंकार दिव्यांबरे दिव्य माता । सुखे राघवा पाहती त्या समस्ता ।। ३७ ।। फळे खाद्य नैवेद्य नाना परीचे । फळाहार ते आणिले कूसरीचे ।। बहूतां परीचे बहू उंच मेवे । म्हणे राम सर्वांस ते पाठवावे ॥ ३८ ॥ समस्तांसि ऊदंड ते पाठवीले । फळें सेवितां लोक संतुष्ट जाले ।। स्वइच्छा स्वये सेविले अल्प कांहीं । जनीं सेवितां तूळणा त्यांसि नाहीं ॥ ३९ ॥ जळे निर्मळे आच्मने शुद्ध केली । समस्तांसि पाने बहू पाठवीली ।। विडे घेतले सर्व ही स्वस्थ जाले । असंभाव्य ते पाक ही सिद्ध जाले ॥४०॥ पुढे मंडळी सेवकांची मिळाली । विशाळे स्थळे सर्व ही सिद्ध केली ।। बहू चित्रशाळा बहू होमशाळा । सडे शिंपिले घातल्या रंगमाळा ॥ ४१ ॥ बह रत्नमंडीत मोठी अचाटे । दुकांठी बहू मांडिली दिव्य ताटें ।। कितीएक ती बत्तिसां वाटियांची । कितीएक विस्तीर्ण नाना परींची ।। ४२ ।। असंभाव्य ती रम्य चित्र विचित्रे । बहूतां परीची बहू तोयपात्रे ॥ बहू आसने दिव्य नाना परीची । असंभाव्य ती घातली कूसरीची ॥ ४३ ।। बहुवर्ण दिव्यांबरे पट्टकूळे । बहूरंग नाना परीची ढुंकूळे ।। असंभाव्य ती सोवळी सिद्ध केली । कितीएक दिव्यांबरे आणवीली ॥ ४४ ॥ पुढे भोजना सर्व ही सिद्ध जाले । कितीएक ते लक्षकोटी मिळाले ।। मिळाली ऋषीमंडळी ब्राह्मणांची। बह भव्य मार्तंड जैसे विरंची ॥ १५ ॥ बये धाकुटे थोर कोटयानकोटी। स्थळे रुधिली जाहली थोर दाटी ।। बहूसाल संतोषले थोर तोपें । असंभाव्य ते गर्जती नामघोषे ।। ४६ ॥ बहूसाल गंधाक्षता पुष्पमाळा । बरी धोत्रपात्रे दिल्या रत्नमाळा ॥ चिरे सुंदरे रम्य यज्ञोपवीतें । धनें चंदने दीधलीं ब्राह्मणांते ।। ४७ ।। ३३. अंदु तोडे. ३१. मेवे फळफळावळ. ३५. दुकुल वो.