पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशा प्रकारें सर्व गोष्टींत सरकारास उत्तम माप { ( लेव्हल ) सांपडलें आहे. देश किती, घरें o जनावरें कितीं, याचे माप ह्मणजे हिशेब पण हवेंत उष्णता किती, थंडी किती, पाऊस हेंही माप पकडून ठेविलें आहे. झाडें कितीं समजण्यास झाडांवर नंबर, गाडीवर नंबर, घोड्यावर नंबर, चाकरावर नंबर, अशा तन्हेचे माप पूर्वीच्या ई कोणाही राजांनां मिळालें नसेल. बादशाही आहे पण { बेबंद किंवा झोटिंग पांदशाही नाहीं. घर कोठे व कसें आहे हें जाणण्यास नकाशा आहे. कितवें घर है ~ हें समजण्यास नंबर आहे. घराच्या मालकास कळविण्यास नोटीस आहे. नकाशा, नंबर, नोटीस याशिवाय आपल्या राज्यांत काय काय चालले आहे हें सांगण्यास तार व पेोष्ट आहे. जेवढे राज्य त्यांच्या ताब्यांत आहे त्या अखंड राज्याची बातमी रोजच्यारोज राजाला समजते. किल्ला बांधून यांत भुयारें करून बंदोबस्तानें ह्मणून जुर्ने राजे राज्य करीत असत; परंतु इंग्रजी राज्यांत किल्यांचे व भुयारांचे कामच उरलेलें नाहीं. जेथें अविच्छिन्न बारा तास नव्हे चोवीस तास किंवा अष्टप्रहर सूर्याची प्रभा उज्वल आहे अशा दिग्भागांत राज्य करीत आहेत. राजा व राज्य हीं अधिरांत नाहीत. तेजःपुंज अशा प्रकाशांत जागृत आहेत.