पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मुसलमानी राज्य झाले तेव्हा डोईस गुंडाळावयाच्या भल्या मोठ्या पटक्यांत प्रजा आवरण्याचा बादशहानें आव घातला; पण त्यावेळीं प्रजा पानावर वाढिलेल्या सारा- प्रमाणें अनावर झाली होती. पुढें पेशवाईत व मराठे- शाहीत मोठ्या पांटी एवढ्या ठेवण्याचा प्रयत्न झाला. पागोट्यामध्ये प्रजा सांठवून तरी ती प्रजा ताटांत वाढ- लेल्या कढीप्रमाणे पसरल्यामुळे ती आवरतां आली नाहीं.
 कंपनी -राज्य सुरू झाल्यानंतर इंग्रजांनी आंटीव खिराप्रमाणें प्रजा वाटी - रूपीं टोपींत सांठवून ठेविली आहे. हा लहान सहान पराक्रम नाहीं. ज्यांच्या राज्यांत तेजःपुंज अशी विजेसारखी अगम्य शक्ति हुकु- मांत राहिली गेली आहे, तेथें सकल जातींच्या व धर्मांच्या प्रजेचा पायाप्रमाणे एकजीव करून ती ताब्यांत ठेवि- ल्यास आश्चर्य तें कोणतें? ज्यांनां समुद्रांत पोहतां येते ते नदीत पोहू शकणार नाहींत काय ?
 हत्ती हा बलाढ्य व सर्वांत मोठा ह्मणून कीं काय त्याला पूर्वकालीन राजे पाळीत असत. पण त्याहून दिसण्यांत अतिशय लहान असून महापराक्रमी असा एक आहे असें कंपनी सरकाराने प्रारंभीच दर्शविलें आहे. तें हैं कीं :--

 एका बाजूस चपल सिंह व दुसरे बाजूस सिंहासा- रखा चलाख असा पराक्रमी घोड्याच्या आकाराचा शरभ

१७