पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सदरहू कमलें व फुले यांचे द्वारें रात्रंदिवस प्रपंचास उपयोगी पडणारी सार्वभौम राजक्रीडा मोठ्या मौजेनें सर्वकाल सुरू आहे. पत्यांच्या खेळाच्या ठिकाणीं कार्ड-पाकिटांचा खेळ आहे. या पच्याच्या खेळांत चौक, एक्का, अशीं नांवें असतात, तर कार्ड - पाकिटांच्या जागीं अमुक मनुष्य, तमुक गांव, असें नांव असतें. बिझिकचे खेळांत मार्क असतात तर नोटींचे खेळांत आंकडे आहेत ( अमुक अमुक रुपयांची नोट ), तेच मार्क होत. या रीतीनें खेळ चालला आहे. जो खेळ राजमान्य तो जगमान्य सहज होतो. कांहीं लोक प्रामिसरी नोटीला परमेश्वरी नोट ह्मणतात. तेंही हाण बरोबर आहे. प्रामिस ह्मणजे वचन. मग वचनाप्रमाणें वागणारा परमेश्वर का नव्हे ! अस्तु.
 भाद्रपदमासी हरितालिकेचें प्रथम दिवशीं पूजन होऊन तिचें विसर्जन झाल्यावर दुसरे दिवशीं श्री गजानन महाराजांचें आगमन होतें. त्या अन्वये महाराणी साहेबांच्या पश्चात् सातवे एडवर्ड सिंहासना- रूढ झाले. त्यांच्या मागून आतां पांचवे जार्ज हे सिंहासनाधिपती झाले आहेत. याविषयीं रूपकः-

रूपक.
महाराणी साहेब रूपीं हरितालिका मातेनें
राज्य रूपी महालांत बसून
१४