पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या हयातीत सबंध राज्य तारायंत्राच्या दोन्यांनी सांवरून धरिलें आहे. ह्मणून तार असलेल्या कोण- इंडियाने हाक मारिली कीं त्याही तार आफीसांतून इंग्लंड 'ओ' ह्मणतें. यावरून एकंदर अफाट राज्य एका हांच्या टप्यावर आणून ठेविलें आहे असें म्हण- ण्यास काय प्रत्यवाय आहे ? असो.
 व्यवहारास लागणाऱ्या प्रत्येक वस्तु ह्मणजे लवंग घ्या, पलंग घ्या, पंचांग घ्या, नारिंग घ्या की रंग घ्या, तेथें कै. महाराणी साहेबांचे अंग म्हणजे साह्य अस- ल्यावांचून कांहींसुद्धां मिळत नसे. हें पाहून असें वाटतें कीं-

आर्या.

भूजल तेज समीरख, रविशशिकाष्टादिकां असे भरली |
स्थिरचर व्यापुनि अवधी, जी मलिकामा दशांगुळे उरली ॥

 ह्या मोरोपंत आर्येप्रमाणें त्या सर्वव्यापी होत्या ह्यांत शंका नाहीं. त्या अखंड भरतखंड व्यापून इंग्लंड येथें राहून तेथूनच आमचीं गान्हाणीं ऐकून न्यायरूपीं हाताने सांभाळ करीत असत. त्यांनी पैसारूपीं पुष्पें उत्पन्न करून प्रजेच्या प्रपंचांत चालू केली. या पुष्पास पूजेच्यावेळी 'सुवर्णपुष्प दक्षिणा' असें ह्मणत अस तात. तर तें सुवर्णपुष्प कसें झाले याविषयी रूपक-

१२