पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लोक.


तर्क व्याकरणादि नाटक - कलालंकार शास्त्रांतरी ।
ज्यांचा खेळ असे विशाल झळके प्रज्ञा प्रभा अंतरीं ।
लीला प्राय समस्त प्राकृत-कथा वेदांत सिद्धांत ते ।
हातीं आमलका समान डुलती सांगों किती काय ते ॥

मा. आ.


 जशीं मुलें एकाद्या लहानशा तलावांत नाव (होडी) टाकून खेळतात तद्वत् अति भयंकर असा समुद्र जणूं काय हत्तीच आहे. त्यास युक्तिरूप अंकुशानें वश करून त्यावर आगबोटरूपी अंबारी चढवून त्यांतून मौजेनें खेळत खेळत हजारों कोसांवरचा प्रवास सहज करता यावा अशी योजना केली आहे. ही आग- बोटे हिंदुस्थानांतून फूं ह्मणून निघाली कीं ती थेट इंग्लंडात जाऊन दाखल होते. तेथून सूं हणून मुटली कीं येथें दत्त ह्मणून हजर होते.

 रेल्वेचा नकाशा पाहिला असतां असें दिसतें कीं, हिंदुस्थान देश म्हणजे केवळ तळहात व रेल्वेचे रूळ हे त्या हातावरील रेषा आणि ह्या तारायंत्राच्या तारा त्या हाताच्या जशा नाड्या आहेत. खरोखरच आग- चोटी, आगगाड्या व तारायंत्रे यांच्या साह्याने सर्व राज्य तळहात बनले आहे. श्रीसूर्यनारायण जसा आपल्या किरणांच्या योगें सान्या भूगोलावरील गुण आकर्षण करितो, त्या अन्वये महाराणी साहेबांनी

११