पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करीत बसला आहे. त्याला 'सर्व्हे नंबर' नांव देऊन शेताची राखण करण्यास लाविलें आहे. कोणी शेताची जमीन मागें पुढे करून कमी जास्ती केल्यास तें त्यानें सरकारास कळविलें पाहिजे. कदाचित् तो बीरोबा इकडे तिकडे होईल ह्मणून त्याला व शेताला नकाशांत वरून ठेविलें आहे. कसा बंदोबस्त झाला ? योजक- स्तत्र दुर्लभः
 हा नकाशा आकाशासारखा पसरला गेला आहे. झाडाचा नकाशा, शेताचा नकाशा, घराचा नकाशा, गांवाचा नकाशा, प्रांताचा नकाशा, देशाचा नकाशा, खंडाचा नकाशा, पृथ्वीचा नकाशा, याप्रमाणे नकाशे बनले आहेत. सर्वजग आकाशाखालीं आहे तर तें सरकारांनी नकाशावर ठेविले आहे.

 पंचमहाभूतें यांचे स्वाधीन होऊन जणूं काय त्यांनीं व आमच्या सकल देवतांनीं महाराणी साहेबांच्या कार- कीर्दीमध्ये आपापली करामत काय आहे ती दाखवि ण्याचा संकल्प केला होता कीं काय कोण जाणे. कारण एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत विद्येच्या प्रत्येक भागाचा नंबर पहिला दिसतो. किती तन्हेची यंत्रे, तऱ्हेचे कारखाने, व किती तन्हेचा माल तयार होतो हे लेखनद्वारे कळविणें अशक्य झाले आहे. एके ठिकाणी हाटलें आहे की---

१०