पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| -- महाराणी साहेबांच्या कारकीर्दीत सरस्वती, भागीरथी व अग्निनारायण वगैरे सकल देवता ऋध्दि सिध्दि होऊन ॐ हात जोडून नम्रपणें दास्यत्व करीत आहेत. तेथे आह्मां ईै तीस कोटी प्रजेचा काय पाड ? स्वतः मेंबर कंवर बांधून - नंबर टिपूं लागल्यावर कारंकुनास कोण पुसते ? पूर्व-काली इकडे मुद्रणकला माहीत नसल्यामुळे साधुसंतांचीं चरित्रे, पुराणे व वेद इत्यादि ग्रंथ लिहिणे अवघड होई; ह्मणून विद्यादेवी मंत्ररूपानें पठणद्वारें गुप्त राहिली होती. पण अशा तर्चेहनें कॉडून राहणे तिला न आवडून ह्मणा किंवा महाराणी साहेबांची कीर्ती वाढविप्रयाकरितां ह्मणा तिनें मंत्रासह यंत्रामध्यें उडी टाकिली. अर्थात ती पालथी पडली. (टाइप उलटे असतात ). तेव्हां तिला उठविल्यावर ह्मणजे छापून काढिल्यावर सुलटी होऊन बसली. अशा प्रकारचे आपले सुंदर }}{{ रूप तिनें वादशाहीण येण्यापूर्वी हिंदुस्थानांत कोणासही o ! दाखविलें नसावें. आणि आतां प्रत्यक्ष प्रगट होऊन खुशाल पुस्तक-रूपानें व वर्तमानपत्रद्वारें पृथ्विपर्यटन करीत आहे. यावरून असे वाटतें की, श्री स्वामिणी सद्गुणखन महाराणी व्हिक्टोरिया ह्या येतील तेव्हांच आपलें खरें स्वरूप व्यक्त करावें असा तिनें निश्चय केला असावा. пг осистоп и рапа оснастоооопа