पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साजरा करितात. तद्वत कै. महाराणी साहेब व सातवे एडवर्ड राजे आणि सांप्रत असणारे पांचवे जार्ज यांच्या कारकीदींचे वर्णन यथामति वर्णिले आहे. पण भाषा मराठी असल्यामुळे ती सरकारास समजेल किंवा नाहीं. ही शंका आली; तेव्हां अंत:करणांत निर्मल सूचना झाली कीं, इंग्रजी राज्यांत भिंतीला तोंड व कान हे अवयव आहेत. (भिंतींत जी तार घुसली ती तारच भिंतीचे कान होत. आणि भिंतींत पत्रे टाक ण्याची जी पेटी आहे तेंच भिंतीचे तोंड होय.) तर असल्या सावयवी राज्यांत सरकारास मराठी भाषा कळणार नाही असें कसें होईल ? कळेलच. असें । समजल्याबरोबर आपोआप शंका दूर होऊन मनास फार कुँ समाधान वाटलें. ईश्वराची भाषा कोणती आहे तें मात्र कळत नाहीं, परंतु अनेक जातींच्या मानवांची भाषा ईश्वर जाणतो. : त्या अन्वयें इंग्रज सरकारची भाषा इंग्रजी आहे, तथापि { संकृत, तामिली, तेलंगी, कानडी, गुजराथी, हिंदुस्थानी, #ै उर्दू, पारशी, मारवाडी इत्यादि अनेक भाषा सरकारास ॐ कळतात. तेव्हां मराठीत लिहिलेलें वर्णन त्यांस सहज }}{{ समजेल अशी खात्री झाल्यावर आनंद झाला. असो. ः परमदयाळू व न्यायी सरकारच्या राज्यांत अन्यायाचा कधींही प्रवेश न होवो अशी प्रार्थना आहे. * AASAASAASAASAASAASAASAASAASAASAASAASASASS

    • *