Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हनुमंत भरतामत बोलतात. पद १६. राग मुलतानी ताल निनाला यावर दुसऱ्याही चाली बसतात.) धरि भरथा धैर्याला ॥ सानुज सीतापतिहा आला ॥ ॥ वालि वधुनि वानर ऋक्षाचा रुग्रीव नृपति केला ॥ मारुतिनें सीता हर्षवुनि जाळियलें संकेला ॥ १॥ सेतु बांधुनी सेनेसह मग त्रिकुटा जवळी उतरला ॥ रावण मारुनि देव सोडिले शोक सागरा तरला ॥ २ ॥ बिभीषणासी राज्य देउनी ॥ अंकी घे जानकिला ॥ बरूनि पुष्पकीं चला त्वरेने हाचि शब्द आ यकिला ॥ ३॥ बोलेना चालेना पाहिना काहिं सचेना त्याला पुशिलें तरि अनुकेंचि बोलतो पाहिन कधिं भरताला ॥ ४ ॥ प्रेमें पाहतां रामहि उतरुनि ॥ आलिंगी स्वजनाला ॥ राज्य- करुनि बंधूसह शेवटिं मुक्त करी दीनाला ॥५॥ धरिंभर० ॥ इतिश्री रामायण प्रकरणं संपूर्ण. समाप्त. श्रीगुरु राधाकृष्ण चरणारविंदार्पणमस्तु॥ श्रीरघुराजप्रसन्न