संघ महारी ॥ ३॥ शरणागत दीना-चरणीं ने ॥ करुणा दृष्टि- निहारी ॥ ४॥ पट्२. लाल जाऊं विदुरा घरी त्या चालीवर) कलियुगिं सकला नामचि तारक ॥ध्रु॥ परमेश्वरहि ज्याना- मानें ॥ झाला जगदोद्वारक ॥ १ ॥ यज्ञादिकहि सर्वा कर्मा ॥ होते जे उपकारक ॥ २॥ वेदशास्त्र ब्राह्मणा सुखदहें ॥ मू- ढा नामविधौरक ॥३॥ महादोष प्रबला विघ्नासी ॥ षट् शत्रूं- चें मारक ॥ ४ ॥ सनकादिक तरले वाल्ह्याही ॥ झाला पाप विदारक ॥ ५ ॥ नागलोकीं गाती महिवर नर || स्वर्गीते वृंदा- रक॥६॥ हेमगर्भमात्रेहुनि दीना ॥ जैशी शंटी सारक ॥७॥ पद३. ● राग पिलु· ताल निताला-> मनुजा हरिभज हो ॥ विषयगरल सम त्यजहो ॥ धृ ॥ अज्ञा- नाने झालें सारें ॥ यासि लुनियां रहासि कसारे ॥ सोडुनि देई व्यर्थ पसारे ॥ सावध होई आजहो ॥१॥ भववैभव हैं दो दिवसांचें ॥ यांत परब्रह्मचि तें साचें ॥ केवळ ज्ञानानें गंवे- साचें ॥ काहिं तरि धरी लाज हो ॥१॥ परमार्थाचा यत्न करा १ बिधारक म्हणजे रक्षण करणारे २ गंवसाचें म्हणजे सांपडायाचें + खटाटोप इ०
पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/४६
Appearance