पद ११. चाल-भाव धरारे- आपुलासा देवक आत्मा कैसा ॥ जो भाविल त्याला तैसा ॥धृ.॥ विचित्र मा येची कल्पना ॥ आधी जीवाची करिरचना ॥ त्यापासून हे विकल्पनाना ॥ ईश्वर नधरी फळवासना ॥ न करी भासा ॥ ॥ १॥ कोणी देहप्राण मन मानिती ॥ कोणी बुद्धि इंद्रिय वृत्ति ॥ कोणी काळदिशा गुण नियती ॥ कुलधर्मादिक दे शप्रवृत्ती ॥ सर्व विलासा ॥ २॥ मौनी नागवेच किति फिरती ॥ योगी एथ्वीवर नां बसती ॥ निर्शन ऊर्ध्वबाहु ते होती ॥ हठानें धूमपान किति करिती ॥ जाति वनवासा ॥ ३॥ को- णी अंगा राव लेपिती ॥ गोपीचंदन मुद्रा लावि ती॥ भा ळी शेंदुर त्रिशूल हातीं ॥ कुंकूं लावुनि कवड्या घालिती ॥ पाहा तमासा॥ ४॥ पृथ्वी आप तेज वायूस ॥ आकाशा- सिन्यूनता ध्यास ॥ रामानुज सोडिति वेदास ॥ लिंगाइत ते बसवण्णास ॥ जैन अहिंसा ॥ ५॥ कोणी परशराम रघुराम ॥ कोणी श्रीकृष्णहि बलराम ॥ कोणी शिवशक्ती रविकाम ॥ गणपति भैरव विठ्ठलनाम ॥ खंडोबा जैसा। ॥६॥ ब्राह्मण ह्मणती वेदसार ॥ क्षत्रि ह्मणती ढालतखा-
पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/४१
Appearance