Jump to content

पान:श्रीहरिदास गोविंद तारक गीत.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

श्रीमसरमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् तारकाश्रमस्वामी महाराज श्रीह- रिगुरुभक्त गोविंदबावा नाशिककर भ्यांची प्रासादिक प्रेमरसभरित पदें सर्व एके ठिकाणी करून तीं छापून प्रसिद्ध केली असतां सर्व जनांचा बहुत उपयोग होईल असे जाणून त्या बद्दल श्री० स्वामिमहाराजांची आज्ञा घेऊ. न नंतर हा ग्रंथ छापण्याचे खटपरीस लागावे तो असे समजण्यांत आले कीं, मागें श्रीमंत तुकोजीराव महाराज होळकर यांचे बंधु सर, काशीराव दादा साहेब होळकर याणी व त्या प्रमाणेंच श्री० धार सरकारचे बक्षी श्री. बापा साहेब याणी हा ग्रंथ छापण्या बद्दल श्री स्वामी महाराज यांजपाशींआ- ज्ञा मागितली; परंतु त्या वेळी, महाराजांनी आपला संतोष न दर्शवून त्याबद्द- ल संमतीही दिली नाही. नंतर पुन्हा काही मंडळी एकत्र जमून त्याणीं परम प्रेमनिष्ठापूर्वक श्री स्वामी महाराज यांचे चरणीं ग्रंथ छापण्या बद्दल आज्ञा देण्या विषयी प्रार्थना केली. त्या वेळी महाराज यांणीं आपला अभिप्राय कळविला तोः-

 " हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केल्याने माझी जगांत कीर्ति व्हावी असा माझा मुळींच हेतु नाहीं. अशा प्रकारे मागें तीन चार गृहस्थानी ग्रंथ छापू- न प्रसिद्ध करण्या बद्दल मजपाशी गोष्ट काढली होती; परंतु ती गोष्ट मजला पसंत न पडून त्या बद्दल मी आपला अभिप्राय दिला नाही. कारण गागें जे महान् महान् सिद्ध, साधु, भगवडत सज्जन मंडळी होऊन गेली त्यां- च्या ग्रंथांचे अवलोकन करना नसा ग्रंश कम्ययाचा अधिकार व नीं करिते