( अभंग ३ ) माझा देह तुजदेखत पडावा | आवडी हे जीवा फार होती ॥ १ ॥ फार होती तरी पुरली पाहतां । चारी देह आतां हारपले ||२|| हारपले माझे सत्यचारी देह । आतां निःसंदेह देहातीत ॥ ३ ॥ निःसंदेह झाला देवा देखतांचि । चितिलें आतांचि सिद्ध झालें ॥ ४ ॥ सिद्ध झाले माझे मनींचे कल्पिलें । दास म्हणे आले प्रत्ययासी ॥ ५ ॥
( अभंग ) जन्मोनियां तूज भजों यात्र बुद्धी । प्राणत्याग संधीं सांभाळिशी ॥ १ ॥ उचित न चुके अचिंत्य श्रीरामा । स्वस्वरूप आम्हां ठाव देई ॥ २ ॥ जन्मवरी तूज धरीले हृदयीं । आतां या समयीं पावें तूं बा ॥ ३ ॥ निष्काम ती तूज सेवा याची आशा | अंती रामदासा सांभाळावें ॥ ४ ॥
( आरती १ ) जयदेव जयदेव आत्मया रामा० ॥ पान १८ पहा.
( आरती २ ) सत्राणे उड्डाणे हुंकार० ॥ पान १८ पहा.
( आरती ३ ) आतां गुरुमूर्ति हृदयी आणा । जो सद्गुरु राणा ॥ ध्रु० ॥ आरती प्रेमान चित्सुख चरणा | ओवाळूनिशरणा | हीन दीन आह्मी बहु अन्यायी, यापरि विनवा दीनोद्धरणा । आतां गुरु ॥ १ ॥ सात्यं नृप जगतीं धन्याच केला, विजये जो भरला ॥ भगवा कटकी मग झंडा सजला, अंतीं उद्धरला ॥ जागोजागीं मठ स्थापना, करूनि बसविलें जानकीरमणा ॥ आतां गुरु० ॥ २ ॥ एकादश हनुमंता स्थापियले, प्रेमें डबडबलें, सकळ जन सन्मार्गा लावियलें, धर्मोज्वल जाहले ॥ सज्जनगडीं येऊनि बैसले, निज दासांच्या भवभयहरणा ॥ आतां गुरुमूर्ति० ॥ ३ ॥
( आरती ४) जयदेव जयदेव जय बालकृष्णा | दर्शनमात्रे हरती तापत्रय तृष्णा ॥ जयदेव जयदेव० ॥ ध्रु० ॥ सद्गुरु यशुमति माता वरदायक झालीं । तेणें सन्मति निश्चित हृदयीं प्रगटली ॥ जयदेव ० १ ॥ स्थापी मारुति मूर्ती काश्यादिक ग्रामीं | महिमा अगाध वदती पौरज सन्नामीं ॥ जय० ॥ २ ॥ चातुर्मास्य केला संतत नामाचा | सुखकर मख भावें महिमा काशीचा ॥ जय० ॥ || ३ || स्वल्पान्ने बहु ब्राह्मण भोजन ते केले । हरिभजनीं अत्य-