Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६

 ( आरती ) जयदेव जयदेव जय पांडुरंगा । निरसी ममसंगा निःसंगा भवभंगा ध्रु० ॥ निर्जरवर स्मरहरधर भीमा- तिरवासी । पीतांबर जघनीं कर दुस्तर भवनाशी । शरणागत- वत्सल पालक भक्तांसी । चालक गोपीजनमनमोहन सुखराशी ॥ जयदेव जयदेव० ॥ १ अणिमा लघिमा गरिमा नेणति तव महिमा | नीलोत्पलदल विमला घननिलतनु शामा | कंटकभंजन साधूरंजन विश्रामा | राघवदासा विगलितकामा निःकामा ॥ जय० ॥ २ ॥

( अभंग समर्थावरचा )

 हुरमुजी रंगाचा उंच मोतीदाणा | रामदासी बाणा या रंगाचा ॥ ध्रु० ॥ पीतवर्ण कांती तेज अघटित । अवाळू शोभत भृकुटीं माजी ॥ २ ॥ काष्टाच्या पादुका स्वामीच्या पायांत । स्मरणीं हातांत तुळशीची ॥ २ ॥ रामनाम मुद्रा द्वादश हे टिळे । पुच्छ ते वळवळे कटीमाजी ॥ ३ ॥ कौपिन परिधान मेखळा खांद्यावरी । तुंबा कुबडी करीं समर्थाच्या ॥ ४ ॥ कृष्णा तटा कासी जहालें दर्शन | वंदिले चरण तुका म्हणे ॥ हुरमुंजी० ॥ ५ ॥

 (भजन) रामदास गुरु माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं ॥

 ( अभंग २ ) धन्य रामदास, धन्य त्यांची माऊली | धन्य गं- गाधर, दीन जना सावुली हो ॥ ध्रु० ॥ धन्य जांबपुरी, धन्य सूर्याजी पंत । कित भाग्य वर्ण, उदरीं आले ॥ हनुमंत धन्य रामदास० ॥ १ ॥ धन्य परळी क्षेत्र, धन्य तेथीचे ते जन । धन्य सज्जनगड, तेथें नांदे गुरु भगवान ॥ धन्य रामदास० ॥ २ ॥ धन्य यशोदामाय, धन्य त्यांचा परिवार | बाळकृष्ण किंकर, केला पाहुनि गुरुवार ॥ धन्य रामदास० ॥ ३ ॥

 ( अभंग ) कष्टी झाला जीव केली आठवण | पावले किरण मारुतीचें ॥ १ ॥ संसारसागरी आकांत वाटला | भुभुःकार केला मारुतीन ॥ २ ॥ मज नाहीं कोणी मारुतीवांचूनी । चिंतितां नि- र्वाणी उडी घाली ॥ ३ ॥ माझे जिणे माझ्या माती लागले । तेणें माझे केले समाधान ॥ ४ ॥ उल्हासले मन पाहतां स्वरूप । दास ह्मण रूप राघोबाचें ॥ ५ ॥