Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सविनय प्रार्थना.

 श्री क्षेत्र काशी येथ यात्रेस येणारे लोकांस उपाध्यांचे घरीं जागा मिळते. तेथें श्रीमंतांचीं व जहागिरदारांची मंदिरें आहेत, त्यांत हुकमाशिवाय जागा मिळत नाही. यामुळे गरीब, अनाथ, ज्यांना द्रव्याचा आश्रय नाही असे ब्राह्मण व विद्यार्थी यांस जाग्याची फार अडचण पडते. श्रीक्षेत्रीं गरिबांस अन्नपाण्याची व्यवस्था आहे. परंतु महाराष्ट्र ब्राह्मणांकरितां आजपर्यंत अशी सोय केलेली नाहीं, ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. अशा लोकांना प्रसंगी साह्य व्हावें, ह्मणून हा मठ स्थापन केला आहे. हा मठ बनारस म्यु० बोर्ड कोतवाली महला नंबर ३७ व मकान नं० ७० व ८८ चे जाग्यांत आहे. ही जागा गंगातीराजवळ असून बुंदीवाले राजेसाहेबांकडून मिळालेली आहे. ही जागा सुमारें १२८८ चौरस दात आहे. त्यांत मध्यभागी श्रीसद्गुरु- बालक महाराज चौंडे वाईकर यांचे हस्तें बजरंग हनुमंताची स्थापना झाली आहे. सदर जाग्यांत कांहीं पत्रा व कांहीं कौलार करून तूर्त व्यवस्था केली आहे. परंतु उन्हाळयांत व पावसाळ्यांत फार त्रास होतो, ह्मणून पाटण ( चुनेगच्ची ) बांधणे फार जरूर आहे. याकरितां बऱ्याच मोठ्या रकमेची अवश्यकता आहे. हल्ली जागजागीं अनेक प्रकारची कार्ये, जीर्णोद्धार, फंड, कारखाने, शाळा, इ० चालू झाल्यामुळे पोटासाठी अशा बादण्यानें फिरण्याचा धंदाच आहे असा पुष्कळांचा समज झाल्याचे दिसतें. तेव्हां हा समज दूर व्दावा व ह्या मठसंस्थेकडून प्रसाद हाणून कांहीं मोबदला द्यावा अशा हेतूनें श्रीरामउपासनाग्रंथ प्रसिद्ध केला आहे. प्रत्येकानें हा ग्रंथ संग्रही ठेवून आबाल- वृद्धांनी वाचनाचा लाभ घ्यावा आणि आश्रय द्यावा.

 या ग्रंथांची किंमत गरीब लोकांस थोडी पडून संस्थेमही सर्वांकडून आश्रय होण्याजोगी बेताची ठेविली आहे. ह्मणून थोर, धनिक, भाविक लोक आपा- पल्या ऐपतीप्रमाणे व नांवलौकिकास साजे अशा प्रकारची योग्य ती मदत देण्यास मार्ग घेणार नाहीत अशी उमेद आहे. ती पूर्ण करण्याकरितां श्री- सद्गुरुचरणीं दासाची प्रार्थना आहे.

 बजरंगमड श्रीहनुमान मंदिर

व्यवस्थापक

 संस्थान ब्रह्मवाट काशी.

गणेश बाबाजी फडके.