Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
॥ रविवारची भजनें. ॥

 ( रविवार ) ॥ अभंग ॥ धन्य सूर्यवंश पुण्यपरायण । सर्वही स- गुण समुदाय ॥ १ ॥ समुदाव काय सांगूं श्रीरामाचा ॥ अंतरीं कामाचा लेश नाहीं ॥ २ ॥ लेश नाहीं तया बंधू भरतासी । सर्वही राज्यासी त्यागीयेलें ॥ ३ ॥ त्यागीयेले अन्न केले उपोषण | धन्य लक्षुमण ब्रह्मचारी ॥ ४ ॥ ब्रम्हचारी धन्य मारुती सेवक । श्रीराम सार्थक जन्म केला ॥ ५ ॥ जन्म केला धन्य वाल्मीक ऋषी । धन्य तीं वचनें भविष्याची ॥ भविष्य पाहतां धन्य विभीषण राघवीं शरण सर्वभावें ॥ ७ ॥ सर्व भावें सर्व शरण वान्नर | धन्य ते अवतार विबुधांचे ॥ ८ ॥ विबुध मंडण राम सर्व गुण । अनन्य शरण रामदास ॥ ९ ॥

 ( भजन ) श्रीरघुबरकी शामसुंदरकी, सीतापतकी बलिहारी ॥

 ( अभंग ) दासाची संपत्ती राम सीतापती | जीवाचा सांगाती राम एक ॥ १ ॥ राम एक माता राम एक पिता । राम एक भ्राता सहोदर ||२|| सहोदर विद्या वैभव कांचन | सर्व हा स्वजन राम एक ||३|| राम एक स्वामी राम हा कैवारी | लाभ या संसारी राम एक ||४|| राम एक ज्ञान राम एक ध्यान । राम समाधान रामदासीं ॥५॥ (भजन) तूं माय मी लेकरूं राघवा नको विसरूं रे नको विसरूं ॥

 ( पद ) अहो मल्हारी द्या मजला आपुली वारी ॥ ध्रु० ॥ तव द्वारींचा मी भीकारी | वाहन तुमचें अश्वावरी । पुढे बसली म्हा- ळसा सुंदरी | वाघ्या मुरळ्या बरोबरी । मणी मल्हारी ॥ द्या मज० ॥ १ ॥ भंडारे तूं शोभसी पिंपळा | भक्त उधळती वेळावेळां । हे जेजुरीगड भूपाळा | दुरित निवारी ॥ द्या मजला० ॥ २ ॥ माणे मल्हासुर असह्य झाला । देवसमूह चित्तीं घाबरला । हा अ- वतार घेतला भला । तूंचि मदनारी ॥ द्या मजला० ॥ ३ ॥

 (भजन) खंडेराया मी शरम आलों तव पाया |

 ( आरती ) जयदेव जयदेव जयजय मल्हारी ॥ वारी दुर्जन वारी निंदक अपहारी ॥ जय० ॥ पंचानन हयवाहन सुरभूषण लीला || खंडामंडित दंडित दानव अवलीला || मणिमल्ल मर्दुनी