( पद ) कृष्णाबाईचे ॥ चा० ॥ चलाहो जाऊ भोला० ॥ कृष्णाबाई मी शरण आलो तंव पायीं ॥ ध्रु० ॥ कृष्णा विष्णु तनु प्रत्यक्ष | ऐसी व्यासमुखाने साक्ष | कलिमल हैरण करा या दक्ष ॥ आली लवलाही ॥ मी शरण० ॥ कृष्णाबाई० ॥ १ ॥ महाबळीं जन्म जननीचा | चिरकाल उदय आवनीचा । विस्तार कोटि लिंगांचा । दिसे ठाई ठाई ॥ मी शरण० ॥ कृष्णाबाई० ॥२॥ वर्णन केवि घडे अंबेचें । थकतिल वेदशास्त्र निज वाचे | पोसले बाळ तया सलिलाचें । गुण गण गाई | मी शरण० ॥ कृष्णाग- बाई० ॥ ३ ॥
( १ ) ॥ आरती ॥ जयदेवी जयदेवी जय माय कृष्णे | आलो तुझिया उदरा निरसी मम तृष्णे ॥ जयदेवी जयदेवी० ॥ ध्रु० ॥ सुख सरिते गुण भरिते दुरितें नीवारी || निःसंगा भवभंगा चिद्गंगा तारी । श्रीकृष्ण अवतार जल वेष धारी | जलमय देहें निर्मल साक्षांत हरी ॥ जयदेवी ॥ १ ॥ हरि हर सुंदर ओघ ऐक्याशीं आले । प्रेमानंदे बोधे मिळणी मिळाले । ऐशीया संगमीं मिस- ळोनि गेले । रामदास त्याची वंदी पाउले || जयदेवी जयदेवी० ॥ २ ॥
( शनवार. ) ॥ अभंग | स्वामी माझा ब्रह्मचारी | मातेसामान अवघ्या नारी ॥ १ ॥ उपजतांचि बाळपणीं । गिळं पाहे वासरमणी ॥ २ ॥ अंगीं सिंदुराची उटी । जया सोन्याची कांसोटी ॥ ३ ॥ राम कृपची सांउली । रामदासांची माउली ॥ ४ ॥ ( भजन ) सीताशोकविनाशन चंद्रा | जयबलभीमा महारुद्रा ॥
(पद) मारुती सख्या बलभीमा हो ॥ ध्रु० ॥ अंजनिचे वचनां- जन लेऊनि | दाखविसी बलसीमा हो ॥ मारुती० ॥ २ ॥ वज्रतनु बलभीम पराक्रम | संगीत गायन सीमा हो ॥ मारुती० ॥ २ ॥ दास म्हणे हो रक्षसि आम्हां । त्रिभुवन पालन सीमा हो ॥ मारु० ॥३॥
( भजन ) मारुतीराया बलभीमा । भजनालागीं द्या प्रेमा ॥
( आरती ) सत्राणे उड्डाणे० ॥ पान १८ पहा.