Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९

तुज अझुनि तरी समज उमज | विषय विष पंडानेयां फुकट कां मरावें | श्रीगुरूचे० ॥ ३ ॥ ( भजन ) जय गुरु महाराज गुरु जयजय परब्रह्म सद्गुरु ॥

 ( टीप ) जसा वेळ असेल त्याप्रमाणे बोधपर, वैराग्यपर, प्रेमयुक्त, करुणायुक्त, पढ़ें, अभंग, वगैरे म्हणून वारांचें भजन म्हणावें. नंतर

( वारांची भजनें)

 ( गुरुवार ) ( अभग ) आदि नारायण सद्गुरु आमुचा । शिष्य झाला त्याचा महा विष्णू ॥ १ ॥ तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस | तेणें ब्रह्मयास उपदेशिलें ॥ २ ॥ तयानें पैं केला उपदेश वसिष्ठा । तेथें धरा निष्ठा शुद्ध भाव ॥ ३ ॥ वशिष्ठ उपदेशी श्री- रामरायासी । रामी रामदासा उपदेशिलें ॥ ४ ॥

 ( अभंग. २) उपदेश देवोनि दिधला मारुती । स्वर्ये रघुपती नीरवता ॥ १ ॥ निरवितां तेणें झालों रामदास । संसारी उदास म्हणोनियां ॥ २ ॥ म्हणोनी आमुचे कुळीं कुळदैवत | राम हनुमंत आत्मरूपीं ॥ ३ ॥ आत्मरूपी झाला रामी रामदाल । केला उपदेश दिनोद्धारा ॥ ४ ॥ (भजन) राम सियावर अवधबिहारी । दंडकवन पावन सुखकारी ॥

 ( पद ) चलाहो जाऊं आज पाय गुरूचे पाहूं ॥ध्रु०॥ नाना दैवते आराधिलीं । तीर्थे व्रतें आजि बहु साधिलीं । सर्वहि आजि फळासी आलीं । पूर्ण हे ध्याऊं ॥ पूर्ण० | आज पाय गुरुचे पाहूं ॥ १ ॥ आळशावरि गुरुगंगा आली । काया पवित्र निर्मळ झाली । उन्मान देहीं सर्व जिराली | तीर्थों जाऊं । तीर्थी जाऊं ॥ आज० ॥ २ ॥ बहु जन्मांचे सुकृत गांठीं । असेल ह्मणुनी झाल्या भेटी | तारक पाय पडले दृष्टी | कवळुनि राहूं । कवळुनि राहूं | आज० ॥ ३ ॥ नरहर चरणीं सदा भाळ । महिपती दासा सर्व काळ । संकटिं रक्षी दीन दयाळ । किती गुण गाऊं । किती गुण गाऊं । आज पायगुरुचे पाहूं || चला हो० ॥ ४ ॥

 ( भजन ) जय गुरु महाराज गुरु जयजयपरब्रह्म सद्गुरु ॥