श्रूषा करिती । तो धरी प्रांती स्पर्शाची ॥ १५ ॥ रूपविषय कैसा
गोंवी । वस्त्र भूषणे देती बरवीं । तेणें सौंदर्य मानी जिवीं । देहीं
भावी लाध्यता ॥ १६ ॥ रसगोडी करितां । घडी घडी धरी
ममता । मग गंधविषय ओढितां । होय तत्वतां तो कैसा ॥ १७ ॥
आवडे सुगंध चंदन । आवडे बुका सुमन । ऐसे पच विषय
पूर्ण | जडले जाण तयासी ॥ १८ ॥ मग जे जे त्यासी मानिती |
तेचि त्याची निंदा करिती । तरी अनुताप नृपजे चित्तीं । ममता
निश्चई पूजकांची ॥ १९ ॥ ऐसा परम अनर्थ साधकासी । जन-
मान्यता विघ्न त्यासी । जेणे लाधे विषयासी । त्या चि.
न्हांसी बोलिलों ॥ २० ॥ ह्मणाल जो विवेकी आहे । त्यासी
जनमान्यता करील काय । हें बोलणे मूर्खीचें होय ।
ज्या चाड आहे मनाची ॥ २१ ॥ ज्ञात्यासी प्रारब्धगती । मान जा
हला तरी न घेती । तेथें गुंतोनि न राहती । उदास होती तत्काळ
॥ २२ ॥ परी साधकांच्या चित्ता | मान गोडी न सोडी सर्वथा ।
जरी कृपा उपजे भगवंता । तरी होय मागुता विरक्त ॥ २३ ॥ तो
विरक्त कैसा ह्मणाल | मानाचें तें टाकी स्थळ | सत्संगी राहे
निश्चळ । न धरी तळमळ मानाची ॥ २४ ॥ न मांडी स्वतंत्र
फड | अंगा येई अहंता वाड | जीविकेची न धरी चाड । न बोले
गोड मनधरणी ॥ २५ ॥ नावडे प्रपंच जनीं बैसणे । नावडे
योग्यता मिरवर्णे | नावडे कोणासी बोलणे | बरवें खाणे
नावडे ॥ २६ ॥ नावडे स्त्रियांत बैसणं । नावडे स्त्रियांते पाहणें ।
नावडे स्त्रियांचे रगडणें । त्यांचा स्पर्श नावडे ॥ २७ ॥ स्वस्त्रिये
वांचूनी | नातळावी आन कामिनी । कोणा स्त्रियेसी सन्निध वाणी |
आश्रय गुणी न द्यावा ॥ २८ ॥ स्वस्त्रियेसीही कार्यापुरते । बो-
लावे स्पर्शावै निरुते । परी आसक्त होऊनि तेथें । विरक्त संत नसाव
॥ २९ ॥ अखंड एकांती असणे । प्रमदासंगें न राहाणें । जे निःसंग
निराभिमान | त्यांजवळी बैसणे सर्वदा ॥ ३० ॥ कुटुंबनिर्वाहार्थ
अन्न | अकल्पित न मिळे तरी कोगन्न । ऐसें ज्याचें वर्तन ।
ते जाणावे वैराग्य ॥ ३१ ॥ ऐसे वैराग्य नाहीं ज्यासी | कृष्ण-
पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/५२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे