नाहीं तरी मूर्खचि राहतो । लोक खाती आपण पाहतो । दैन्य वाणा ॥ २३ ॥ ऐका सदैवपणाचे लक्षण | रिकामा जाऊं नेदी क्षण | प्रपंचव्यवसायाचें ज्ञान | बरें पाहे ॥ २४ ॥ कांहीं मेळवी मग जेवी । गुंतल्या लोकांस उगवी । शरीर कारणी लावी । कांहीं तरी ॥ २५ ॥ कांहीं धर्मचर्चा पुराण | हरिकथा निरूपण | वायां जाऊं नेदी क्षण | दोहींकडे ॥ २६ ॥ ऐसा जो सर्वसावध | त्यास कैंचा असेल खेद | विवेकें तुटला संबंध | देहबुद्धीचा ॥२७॥ आहे तितुकें देवाचें । ऐसे वर्तणें निश्चयाचें | मूळ तुटले उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥ प्रपंचों पाहिजे सुवर्ण । परमाथ पंचकरण | महा वाक्याचे विवरण | करितां सुटे ॥ २९ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । येणे राहे समाधान | परमार्थाचे साधन । तेंचि ऐकत जावें ||३०|| इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादश दशके शिक्षानि- रूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
वेदांतसंमतीचा काव्यसिंधु भरला । श्रुतिशास्त्रग्रन्थ गीता साक्ष संगम केला । महानुभाव संतजन अनुभव चाखीला । अज्ञान जड जीवां मार्ग सुगम जाला ॥ १ ॥ जय देवा दासबोधा ग्रन्थराजा प्रसिद्धा । आरति ओंवाळीन विमळज्ञान बाळबोधा || ध्रु० ॥ नवविधा भक्तिपथ रामरूपा अनु- भवी । चातुर्यनिधी मोठा माया चक्र उगवी । हरिहरहृदयचें गुह्य प्रगट दावी । बद्धचि सिद्ध जाले असंख्यात मानवी ॥ २ ॥ जय देवा • ॥ वीसहीं दशकींचा अनुभव जो पाहे । नित्यनेम विवरीतां स्वयें ब्रह्मचि होय । अपार पुण्य गांठी तरी श्रवण लाहे | कल्याणलेखकाचें भावगर्भ हृदयीं लाहे ॥ || ३ || जय देवा० || अच्युतं केशवं गुरुपरंपरा म्हणून पूर्वी पंचपदी झाली असल्यास भजनाचा शेवट करण्याचाही कोठे कोठे परिपाठ आहे. तो प्रकार शेजारती जवळ पहावा.
टीप - नंतर तीर्थप्रसाद वाटावा आणि सायंकालचा फलाहार वगैरे करून पूर्वी झाली नसल्यास पंचपदीस सुरवात करावी.