Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२

 ॥ राजाधिराज अयोध्यावासी श्रीरामचंद्राय महारजकी जय ॥ ॥ श्रीहनुमानमहारजकी जग ॥ श्रीसद्गुरुरामदास स्वामी महाराज. की जय ॥ आईसाहेब महाराज की जय ॥ श्रीसद्गुरुबालकराम- महाराजकी जय ॥ जयजय रघुवीर समर्थ ॥ श्लोक ॥ १ सदा सर्वदा० पान १६ पहा. उपासनेला० पान १६ पहा. जतजय रघु० ॥

( पद. )

 वदन सुहास्य रसाळ हा राघव । सर्वांगीं तनु सुनीळ हा राघवा ॥ १ ॥ मृगनाभी रेखिला टिळा हा राघव | सर्वागीं सुमनमाळा हा० ॥ २ ॥ साजिरी वैजयंती हा० । पायीं तोडर गर्जती हा० ॥ ३ ॥ सुंदर लावण्यखाणी हा० ॥ उभा कोदंडपाणी हा० ॥ ४ ॥ सकल जीवांचे जीवन हा० ॥ रामदासीं प्रसन्न हा० ॥ ५ ॥ ( पद २ रें ) त्रिविधतापहारक हे गुरुपाय | भवसिंधूसी तारक हे गुरु पाय ॥ १ ॥ स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय ॥ ज्ञानाचें निजगुज हे गुरुयाय ॥ २ ॥ भक्तिपथासी लाविती हे गुरुपाय | नयनीं श्रीराम दाविति हे गुरुपाय ॥ ३ ॥ सहज शांतिचें आगर हे गुरुपाय | पूर्ण कृपेचे सागर हे गुरुपाय ॥ ४ ॥ रामदासाचें जीवन हे गुरुपाय | सकल जीवांसी पावन हे गुरुपाय ॥ ५ ॥ सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ.

 १ मनबोधाचे श्लोक नित्य नवे ह्मणावे. प्रकरण पुढे पहा.

 २ राममंत्राचे श्लोक नित्य नवे ह्मणावे. प्रकरण पुढे पहा.

॥ श्रीराम जयराम जयजयराम
।। दासबोध दशक ११ वा. समास तिसरा ॥

 श्रीगणेशाय नमः ॥ ॥ बहुतां जन्मांचा शेवट | नरदेह सांपडे अवचट | येथे वर्तावें चोखट । नीतिन्यायें श्रीराम ॥१॥ प्रपंच करावा नेमक । पहावा परमार्थ विवेक । जेणे करितां उभय लोक । संतुष्ट होती ॥ २ ॥ शत वरुपैं वय नेमिलें । त्यांत वाळत्व नेतां गेलें । तारुण्य अवर्धे वेचले | विषयांकडे ॥ ३ ॥ वृद्धपणीं नाना