Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०

माता । भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता | खेचर वनचर फणिवर भरता निजभ्राता | दशरथ नृपनायक धन्य तो पीता ॥ जयदेव जयदेव जय रघुकुळटिळका || आरती ओवाळूं त्रिभुवननायका | जयदेव जयदेव ॥ १ ॥ आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ | रवि- कुळमंडण खंडण संसारमूळ । सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ । धन्य तो निजदास भक्त प्रेमळ ॥ जयदेव जयदेव ॥ २ ॥

 ॥ ३ ॥ आरती मारुतीची. सत्राणे उड्डाणे० पान १८ पहा.

 ॥ ४ ॥ आरती सद्गुरूची. सुख सहिता दुख रहिता० पान १८.

 ॥ ५ ॥ आरती समर्थांची ॥ ब्रह्मा विष्णू हरादिक० पान २२ पहा.

 ( टीप ) पुढें आरतीसह प्रदक्षिणा तीन घालाव्या.

 धन्य धन्य ही प्रदक्षिणा रामदास गुरूची | ब्रह्मकुलीं अवतार जयावरि पूर्ण कृपा प्रभूची ॥ कटिं कौपिन परिधान करुनी पदिं- कांति खडावांची ॥ भव्य मेखळा भृकुटीं अवाळू प्रभा लांगुलाची ॥ धन्य धन्य० ॥ध्रु०॥ रामदास गुरु समर्थ दुस्तर भवाब्धिचें तारूं ॥ धन्य शिष्य कल्याण शिवाजी उद्धव परिवारू ॥ धन्य धन्य सज्जनगड जेथें समाधि श्री गुरुची ॥ धन्य धन्य ही० ॥ १ ॥ धर्म- तत्व वेदांत शिवाजीचित्तीं माजविला || गोब्राह्मणप्रतिपालज याचा डंका गाजविला ॥ धर्मध्वज भूवरी उभारुनि मस्ति जिरवी कलिची || धन्य० ॥ २ ॥ सावधान ह्मणतांचि उडाले धन्य जगीं झाले || संप्रदाय मठ एकादश हनुमंता स्थापियले ॥ निज दद्वारा दाद लाविली दीन बालकाची ॥ धन्य धन्य० ॥ ३ ॥

 टॉप-अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं । श्रीघर माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं श्रीरामचंद्रं भजे ॥ १ ॥ हरेराम हरेराम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । सीताकांत स्मरण जयजय राम | पार्वतीपते ● || हनुमानमहाराजकी जय || सद्गुरु राम महाराज की जय जयजय रघुवीर समर्थ ॥ मंत्रपुष्प करावा.

म/५03)