ब्रह्मशक्ती ॥ शास्त्रपुराणे वेदश्रुती । अखंड जियेचें स्तवन करिती । जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ति | चिद्रूपिणी ॥ विस्तारें वाढळी इच्छा शक्ती । चराचरीं जियेची व्याप्ती । जगन्माता ॥ रामदासाचा किं. कर । सदा झाडी महाद्वार | रामनाम अलंकार | कंठीं हर्षे ना- चतो ॥ ह्मणावा जयजयराम० ॥ १५ ॥
३ – ( शनिवारची ) जब हनुमंत जनक दुहिता० ॥ पान ३५ ॥
४ – ( रविवारची ) धन्य धन्य विश्वनाथ | केला मणिमल्लनिः पात | नांव पावले म्हाळसाकांत । अश्वारूढ जाहले ॥ हस्ती खंडा प्रचंड | भक्त नाचती उदंड । जयजयकाराची घमंड | भंडार अ- खंड उधळती ॥ बानु म्हाळसा शोभती । वाघ्या मुरळ्या पुढे नाचती । स्वर्गी देव पुष्पवृष्टी करिती । आनंद ब्रह्मांडी नसमाये ॥ बोध वैराग्य दिवट्या झळकती ॥ अनुहात बाजे वाजती । भक्ति- निशाण घेऊनि हाती । बालकराम धांवतो ॥ ह्मणावा जय जय ॥१६॥
५ – ( सोमवारची ) धन्य कैलासभुवन० ॥ पान ३५ पहा.
६ - ( मंगळवार ) धन्य तुळजापुर सुंदर | माता नांदे घरोघर- तेतीस कोठी सुरवर । उभे असती त्या ठायां ॥ यात्रा येतसे अ पार । उदो बोलाचा गजर ॥ गोंधळपोत निरंतर | चमत्कार पा वती ॥ तेथे येतां रामदास । श्रीरामचरणीं दृढ विश्वास । अंतरीं धरोनि आस । रामध्यान करीतसे ॥ रामरूपी देवी झाली । शि- वशक्ति आकारिली । नामें अंतरी निवाली । लक्ष पाय ठेविला ॥ ह्मणावा जयजयराम ॥ १७ ॥
७ - ( बुधवारची ) नाम विठ्ठल सुंदर | ब्रह्मा विष्णु आणि हर । गुणातीत निर्विकार । शुकादिकों गाइला ॥ चंद्रभागा रम्य तीर । तेथे उभा कार्ट कर | दिंडया पताका अपार । यात्रा घोष जहाला ॥ तेथें येतां रामदास । दृढ श्रीरामी विश्वास | रुप पालटोनि त्यास । रामरूपी भेटला ॥ पुन्हां विठ्ठलस्वरूप | राम विठ्ठल एकरूप पूर्वपुण्य हे अमूप | लक्ष पायीं ठेविला ॥ ह्मणावा जयजय ॥ १८ ॥