॥ समर्थांची सवाई ॥ ८ ॥ श्रीसमर्थ मुख्य प्राण | सच्चिदानंदाची खाण | जगदोद्धारासी ठाण | मांडिलें जेणें । अविद्येची ताणाताण | ममतेची दाणादाण | अभिमानाचा पाषाण | फोडिला त्वरें । जीव अत्यंत अजाण । तेचि झाले सुजाण । क्वचित् घेतां आडरान । मागा लाविती त्वरें ॥ वचन जेविं रामबाण | कदा नव्हे अप्रमाण । निश्चयेंसी समाधान | राम राम बोलणे ॥ म्हणावा जयजय राम ॥ ॥ समर्थाची सवाई ॥ ९ ॥ धन्य रामीरामदास । गंगातीरीं ज्यांचा वास | आले कृष्णा- तोर सज्जनगडास | जगदोद्धार करावया ॥ आज्ञा दिधली कल्याणास यशस्वी दासाचा हा दास । लागे पायास ॥ म्हणावा जयजय राम ॥ १ ॥ ॥ श्रीसमर्थांची सवाई ॥ १० ॥ जयजय सद्गुरु रामदास । भक्ति जयाची अविनाश | ज्ञान पाहतां सर्वोत्कृष्ट । महा मेरू वैराग्याचा ॥ भाळी शोभे अवाळू । हुरमोजी गळा मेखळा | परि गौर वर्ण | मस्तकीं चिरा भर्जरिचा । काव्य जयाचे दासबोध | आबाल वृद्धां केला बोध | दोनशें पांच मनबोध | भक्तिज्ञान वैराग्य ठसावे ॥ समाधी सज्जनगडी पाही । चाफळामाजी राम विदेही । त्याचा दासानुदास पाही । म्हणवा जयजय राम ॥ २ ॥ ॥ श्रीरामाची सवाइ ॥ ११ ॥ सिंव्हासन पर बैठे राम । कपी आये जो तमाम | पीछे ठाडे श्रीहनुमान | करै नोकरी ॥ कपी कहत रघुराज । बडा हुवा अपना काज । नेहल करो महाराज | फुकट करी नौकरी ॥ सुग्रीवकू दिया गांव | भरतकू दिया भाव । हनुमानकू दिया नाव | कुछ मतल- बसे ॥ देनेवाला रघुवीर । कै होय दिलगीर | व्यास भये फकीर । अजगर का दाता राम ॥ म्हणावा जयजय राम ॥ ३ ॥
पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/४२
Appearance