Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥ सवाई शंकराची ॥ ४ ॥

 धन्य कैलासभुवन, शुभ्रशंकराचें ध्यान, पुढे नाचे गजानन, सिंहासनीं बैसला ॥ वाचें उच्चारितां हर, त्यासि देतो महा वर, करी पातकाचा संहार, अंकीं गिरिजा शोभली ॥ कृष्णा गोदा भागीरथी, ज्याचे जर्टेतूनि निघती, पावन त्या त्रिजगतीं, स्नान पाना लाधल्या ॥ भैरवादि समुदाय, रामनाम नित्य गाय,भव- भ्रम सर्व जाय, लक्ष पाय ठेविला ॥ म्हणावा जय जय राम ॥

 शिवमर्निचा हा राम, तो हा दाशरथी राम, जनीं म्हणे पूर्ण काम, मध्यभागीं शोभतो ॥ रामनवमीची घमंड, यात्रा मिळाली उदंड, तेथें होतसे प्रचंड, धिंग फार गाजतो ॥ मिळताती संतजन, कथा होतसे गहन । तेथे वाटे समाधान, नयनांसी पारणे ॥ धन्य चाफळ सुग्राम, तेथे माझा राजाराम, त्र्यंबकासी सुखधाम, राम राम बोलणे ॥ म्हणावा जय जय राम ॥

॥ सवाई मारुतीची ॥ ६ ॥

 • जब हनुमंत जनकदुहिता | सुदलेनेको गगन के भर दौर रहे । तब कंठ गुरगुरगुरीत | नेत्र गरगरगरीत | रोम थरथरथरीत । पुच्छ झारे ॥ तब कंठ घरघरघरीत । बनमो दरदरदरीत | सीता शोक हरत झरझर बन उफारे ॥ तब कंठ चुकचुकचुकीत | इंद्र- जीत चकचकचकीत | रावन थकथकथकीत । कर नगर भरभर- भरीत | रोम मखमखमखीत । हेम लखलखलखीत । दास कहे जब तुम राम मिले । तब कपि भुभूःकार करे ॥ म्हणावा जय जय राम ॥

॥ सवाई चाफळपुरी ॥ ७ ॥

 सभवती गिरीवर, नाना जाती तरुवर, पुष्प वाटिका अपार, मन निवे पाहतां ॥ स्थळ पाहतां सबळ, नाम साजिरें चाफळ, होती कामना सफळ, जिचे ठायीं राहतां ॥ मूळ स्थापना यथार्थ, रामदासाचा कृतार्थ, राजा राम तो समर्थ, स्वामी येथे नांदतो ॥ हर हृदयीं केवळ, ऐसे भासती सकळ, निरूपमेय महास्थळ, शोक सर्व भंगतो ॥ म्हणावा जय जय राम ॥,