जवी आत्मसत्ता ॥ भजारे० ॥ ६ ॥ पथ भेटतां बोलती रामराम । पहा सर्व ठायीं असे एक नेम । गुरूची कृपा वंद्य झाली समस्तां ॥ भजारे० ॥ ७ ॥ शिवाजीशिरी ठेवुनी आत्महस्ता | वना यावना छेदवीलें समस्ता ॥ पहा धेनुविप्रां मही तोषवीता || भजारे० ॥ ८॥ अती पातकी दीन या बालकासी । निजानंद देईल जो ज्ञानराशी । प्रणीपात हा पादपद्मास आतां । भजारे भजा ॥ ९ ॥ जय जय रघुवीर समर्थ.
तुझा भाट मी वर्णितों रामराया । सदा सर्वदा गाय ब्रीदें स वाया । महाराज दे अंगिचें वस्त्र आतां । बहूजीर्ण झाली देहेबुद्धि कंथा ॥ १ ॥ जय जय रघुवीर समर्थ.
गणपतीची ॥ वंदिला गजवदन । मुख सुखाचें सदन । जेणे जाळिला मदन । त्यासी अंतरीं धरा ॥ अहो रामनाम । जनीं सज्जनीं विश्राम | साधकांचें निजधाम | हीत आपुले कर। | अखंडित निजध्यास | धरा अंतरी हव्यास | बोले भागवतीं व्यास । हार- भजने तरा ॥ धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर | सोड. विले सुरवर । वरदायक खरा ॥ म्हणावा जयजयराम ॥
नाम श्रीराम सुंदर, ध्याती उमामहेश्वर, सिंहासनीं रघुवीर, अंकी सीता शोभली ॥ लक्षुमण महावीर, भरत शत्रुघ्न धीर, हनु- मंत जोडीकर, देवऋषीं गाईला ॥ ज्याचे ध्यानीं रामदास, तेच ध्यान कल्याणास, बंधू दत्तात्रयास, रामप्रेमा लाधला ॥ वर्णू राघवाचे यश, श्रीगुरूचा नामघोष, पूर्वपुण्य हे विशेष लक्ष पायीं ठेविला ॥ म्हणावा जय जय राम ॥
रामदूत वायुसूत भीमभार्गव यूथपती, जो नरांत वानरांत भक्ति प्रेम वित्पती । दास दक्ष स्वामिपक्ष नजिकाज सारथी । वीर- जोर शीरजोर धन्य दास मारुती ॥ म्हणावा जय जय राम ॥