Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२

रामदास ह्मणे माझां संसार तुज लागला । संशयो वाटतो पोटीं बुद्धि दे रघुनायका ॥ १३ ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥  ॥ ६ ॥ समाधान साधूजनाचेनि योगें । परी मागुते दुःख झाले वियोगें । घडीनें घडी शीण अत्यंत वाटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥ १ ॥ घरें सुंदरें सौख्य नाना परीचे । परी कोण जाणेल ते अंतरींचें । मनीं आठवितांचि तो कंठ दाटे | उदा० ॥ २ ॥ बळें ला- वितां चित्त कोठें जडेना | समाधान ते कांहिं केल्या पडेना । नव्हे धीर डोळां सदा नीर लोटे | उदा० ॥ ३ ॥ अवस्था मनी लागली काय सांगूं । गुणी गुंतलों हेत कोणासि सांगूं । बहूसाल भेटावया प्राण फूटे | उदा० ॥ ४ ॥ कृपाळुपर्णे भेट रे रामराया. | वियोगे तु झ्या सर्व व्याकूळ काया । जनामाजि लौकीक हाही न सूटे । उ- दा० ॥ ५ ॥ अहारे विधि है असे काय केले । पराधीनता पाप माझे उदेलें । बहूतांमधें तूकतां तूक तूटे | उदा० ॥ ६ ॥ समर्था मनीं सां- डि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी | घडेना तुझा योग हा प्राप्त कोठें । उदा० ॥ ७ ॥ अखंडीत हे सांग सेवा घडावी । न होतां तुझी भेट काया पडावी । दिदीस आयुष्य हे व्यर्थ लोटे | उदा० ॥ ८ ॥ भजो काय सर्वा पूरी हीन देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा । ह्मणों काय मी कर्मरेखा न लोटे ॥ उदा० ॥९॥ ह्मणे दास मी वास पाहें दयाळा | रघूनायका भक्तपाळा भुपाळा । पहावें तुला है जिवीं आर्त मोठे । उदा० ॥ १० ॥ जयजय० ॥  ॥ ७ ॥ उदासीन हा काळ जातो गमेना । सदा सर्वदा थोर चिंता शमेना । उठे मानसीं सर्व सोडोनि जावें । रघूनायका काय कैसे करावें ॥ १ ॥ जना बोलतां बोलतां वीट वाटे । नसे अंतरीं सूख कोठें न कंठे । घडीने घडी चित्त कीर्ती धरावें | रघुनाय० ॥ २॥ बहू पाहतां अंतरी कोंड होतो । शरीरास तो हेत सांडोनि जातो । उपाधीस देखोनि वाटे सरावें | रघुनाय० ॥ ३ ॥ अवस्था मनीं होय नानापरींची । किती काय सांगूं गती अंतरींची | विवेकेंचि या मा- नसा आवरावें । रघूनायका० ॥ ४ ॥ म्हणे दास ऊदास झालों दु- थाळा । जनीं व्यर्थ संसार हा चायचाळा । तुझा मी तुला पूसतों

  1. प्रीय भावें । रघु० ॥ ५ ॥ जयजय रघुवीर समर्थ ॥