मदीयांतरों नाम घेतां | रघुनायका० ॥ ३ ॥ सदा सर्वदा योग तूझा घडावा तुझे कारणों देह माझा पड़ावा उपेक्षूं नको गुणवंता अनंता ॥ रघुनायका० ॥ ४ ॥ नको द्रव्यदारा नको येर- झारा । नको मानसीं ज्ञानगवें फुगारा सगूणों मला लावि रे भक्तिपंथा | रघुनायका० ॥ ५ ॥ भवें तापलों प्रोतिछाया करावी ॥ कृपासागरे सर्व चिंत्ता हरावी । मला संकीं सोडवावे समर्थ | रघुनायका० ॥ ६ ॥ मनीं कामना कल्पना ते नसावी | कुबुद्धी कुडी वासना नीरसावी । नको संशयो तोडिं संसारवेथा । रघुनायका० ॥ ७ ॥ समर्थपुढे काय मागा कळेना | दुराशा मन बैसली हे ढळेना । फुटे संशयो नीरसी सर्व चिंत्ता | रघुनायका० ॥८॥ ब्रिद्राकारणे दीन हातीं धराव । ह्मणे दासभक्तासि रे उद्धरावें । सुटे ब्रीद आह्मासि सोडोगि जातां । रघुनायका० ॥ ९ ॥ जयजय० ॥
॥ ५ ॥ युक्ति नाहीं बुद्धि नाहीं विद्या नाहीं विवंचिता । नेणता
भक्त मी तुझा बुद्धि दे रघुनायका ॥ १ ॥ बोलतां चालतां येना का-
र्यभाग कळेचिना | बहु मी पीडिलों लोकों बुद्धि दे रघुनायका ॥२॥
तुझा मी टोणपा झालों कष्टलों बहुतां परी । सौख्य ते पाहतां नाहीं
बुद्धि दे रघुनायका ॥ ३ ॥ नेटके लिहितां येना वाचितां चूकतों
सदा । अर्थ तो सांगतां येना ॥ बुद्धि दे रघुनायका ॥४॥ प्रसंग वेळ
तर्केना सुचेना दीर्घ सूचना | मैत्रिकी राखितां येना बुद्धि दे रघु-
नायका ॥ ५ ॥ संसार नेटका नाहीं उद्वेग वाटतो जिवीं । परमार्थ
हा कळेना की बुद्धि दे रघुनायका ॥ ६ ॥ उदास वाटतें जीवों आ
तां जावें कुणीकडे । तूं भक्तवत्सलादेवा बुद्धि दे रघुनायका ॥ ७ ॥
कायावाचा मनोभावें तुझा मी ह्मणवीतसे । हे लाज तुजला माझी
वुद्धि दे रघुनायका ॥८॥ मुक्त केल्या देवकोटि भूभार फेडिला बळें ।
भक्तासि आश्रयो मोठा बुद्धि दे रघुनायका ॥ ९ ॥ उदंड भक्त
तुझांला आह्मांला कोण पूसतें | ब्रीद हैं राखणे आधी बुद्धि दे रघु-
नायका ॥१०॥ उदंड ऐकिली कीर्ति पतितपावना प्रभो । मी एक रंक
निर्बुद्धि बुद्धि दे रघुनायका ॥ ११ ॥ आशा हे लागली मोठी दया-
ळुवा दया करीं । आणखी नलगे कांहीं बुद्धि दे रघुनायका ॥१२॥