चरित्रे ॥ निर्गुणाची तत्त्वयंत्रे ॥ हीं दोन्ही परम पवित्रे ॥ ऐकत जावीं ॥ ३२ ॥ जयंत्या उपोषणे नाना साधने ॥ मंत्र यंत्र जप ध्यानें । कीर्ति स्तुति स्वतनें भजने ॥ नानाविध ऐकावीं ॥ ३३ ॥ ऐसे श्रवण सगुणाचें || अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें ॥ विभक्ति सांडून भक्तीचें ॥ मूळ शोधावें ॥ ३४ ॥ श्रवणभक्तीचे निरूपण | निरूपिलें असे जाण ॥ पुढे कर्तिनभजनाचे लक्षण || बोलिलें असे ॥ ३५ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थ दशके श्रवणभक्तिनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन । आतां ऐका विष्णोःस्मरण | तिसरी भक्ति ॥ श्रीराम ॥१॥ स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरण पावावें ॥ समाधान ॥ श्रीराम ॥ २ ॥ नित्यनेम प्रातःकाळीं । माध्यान्हकाळी सायंकाळीं । नामस्म- रण सर्वकाळीं । करीत जावें ॥ श्रीराम ॥३॥ सुखदुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेविण सर्वथा । राहोंच नये ॥ श्रीराम ॥ ४ ॥ हरुषकाळों विषम काळा | पवकाळा प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळी निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ श्रीराम ॥ ५॥ कोर्डे सांकडें संकट | नाना संसार खटपट | अवस्ता लागतां चटपट | नामस्मरण करावें ॥ श्रीराम ॥ ६ ॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ श्रीराम ॥७॥ संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती | सांडूच नये ॥ श्रीराम ॥ ८ ॥ वैभव साम- र्ध्य आणि सत्ता | नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ श्रीराम ॥१॥ आधीं अवदसा मग दसा | अथवा दसेउपरी अवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ श्रीराम ॥ १० ॥ नामें संकटें नासती । नामे विले निवा-