Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ( भूपाळी ) राम सर्वोर्गे सांवळा । हेमअळंकार पवळा | नाना रत्नांचिया कळा | अळंकार शोभती ॥ ध्रु० ॥ पिंवळा मुगूट की- रिटी | पिंवळे केशर लल्लाटीं । पिवळ्या कुंडलांच्या थाटी। पिंव- ळ्या कंठीं वनमाळा ॥ राम० ॥ १ ॥ पिंवळें पदक करभूषणें । बाहु- वटीं करकंकणें । पिवळ्या मुद्रिकांचे लेणे | पिंवळे करीं शरचाप । ॥ राम० ॥ २ ॥ पिंवळा कासे पितांबर | पिंवळ्या विदाचा तोडर । पिवळ्या घंटांचा गजर । पिवळ्या वांक्या साजती ॥ राम० ॥ ३ ॥ पिवळा मंडप विस्तीर्ण । पिवळें मध्ये सिंहासन | राम सीता लक्षुमण | दास गुण गातसे ॥ राम० ॥ ४ ॥ भजन ॥ जय रघुनंदन जय सिताराम । अवध बिहारी राजाराम ॥

 (भूपाळी ) धवळे भोळे चक्रवर्ती | धवळे अळंकार शोभती । धवळे ध्यान उमापती | सदा चित्तीं स्मरावें ॥ ध्रु० ॥ धवळ्या जटा गंगाजल | धवळा चंद्र निर्मळ | धवळे कुंडलांचा लोळ | शंखपाळा लोंबती ॥ धवळे० ॥ १ ॥ धवळी स्फटिकांची माळ । धवळे गळां उलथे व्याळ | धवळें हातीं नरकपाल । धवळा त्रिशूळ शोभतसे ॥ धवळे० ॥ २ ॥ धवळा सर्वांगे आपण। धवळें विभूतीचें लेपन | धवळें गात्र धवळे वसन | धवळें वहन नंदीचे ॥ धवळे० ॥ ४ ॥ धवळें कैलासभुवन | धवळे मध्ये सिंहासन | धवळें शंकराचें ध्यान | दास चिंतन करितसे ॥ धवळे० ॥ ५ ॥ ॥ भजन || शिव हर शंकर गौरीशं, वंदे गंगाधरमीशं । रुद्रं पशुपति. मीशानं कलये काशीपुरनाथं ॥

 फांकडे आरती परमात्मया श्री रघुपती । राजाराम श्रीरघु- पती । जिवीं जिवां ओवाळिन । निजीं निज आत्मज्योती ॥ ध्रु० ॥ त्रिगुण कांकडा द्वैतघृते तिबियेला | उजळीली आत्मज्योती, तेणे- प्रकाश झाला | कांकडे० ॥ २ ॥ काजळी ना मैस अवघें तेज डळ- मळ । अवनी ना अंबर, अवघें निघोट निश्चळ ॥ कां० ॥ ३ ॥ उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळीं । रामी रामदास सहजीं सहज ओवाळीं ॥ कां० ॥ ४ ॥ ॥ भजन ॥ रामा, रामा हो रामा० ॥