Jump to content

पान:श्रीराम उपासना ग्रंथ.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
:१३

धर्मा रक्षण करिसी तूं ॥ ४ ॥ दास बजरंग लागे पायीं ॥ मागे इच्छा हेंचि देई ॥ बालकरामाची तूं आई ॥ प्रतिपाळावें भक्तासी ॥ महालक्षुमी० ॥ ५ ॥

॥ भजन ॥ श्री गौरीशंकर प्राणेश्वरीं रंगा येई हो ॥

 बुधवार- उठोनियां प्रातःकाळीं ॥ चिंता विठ्ठल माउली || दीनजनांची साउली ॥ भक्तकाजों उभी असे ॥ ध्रु० ॥ भीमानिकटीं पंढरपुरीं । शोभे जैसी विष्णुपुरी ॥ ब्रह्मादिकही महाद्वारी | दर्शन काजा तिष्ठती ॥ १ ॥ नारद तुंबर पातले ॥ तुका नामा तेथें आले ॥ भो- वतीं वैष्णवांचे मेळे ॥ ध्वजा पताका झळकती ॥ २ ॥ पुंडलिकानें धरणे दिलें ॥ मातापितरां उद्धरिलें ॥ भगवे झेंडे उभारिले ॥ पंढरिमाजी दिसताती ॥ ३ ॥ आली कार्तिकी एकादशी || चला जाऊं पंढरिसी ॥ पाहूं विठ्ठलरखुमाइसी ॥ चरणीं माथा ठेउनियां ॥ ४ ॥ दास बजरंग तेथें येतां ॥ आनंद झाला त्याचे चित्ता ॥ बालकरामाचे सांगाता ॥ चरणावरी लोळतसे ॥ उठोनियां ॥५॥

 ॥ भजन ॥ जयजय विठोबा रखुमाई, सांवळ्या विठोबा रखुमाई ||

 (भूपाळी) उठिं उठिं वा रघुनाथा । विनवी कौसल्यामाता | प्रभात झालीसे समस्तां । दाखवीं आतां श्रीमूख ॥ ध्रु० ॥ कनकता आरतीया । घेऊनि क्षमा शांती दया । आली जनकाची तनया ॥ ओंवाळाया तुजलागीं ॥ उटिं० ॥ १ ॥ जीव शिव दोघेजण | भरत आणि तो शत्रुघ्न | भाऊ आला लक्षुमण | मन उन्मन होउनियां ॥ उठिं० ॥ २ ॥ विवेक वसिष्ठ सद्गुरु | संत महंत मुनेश्वरु | करिती हरीनामें गजरु | हर्षे निर्भर होउनियां ॥ उठिं० ॥ ३ ॥ सुमंत सात्विक प्रधान । घेवोनि नगरवासी जन । आला वायूचा नंदन । श्रीचरण पहावया ॥ उठिं० ॥ ४ ॥ माझा जिवींचा जिव्हाळा | दीनबंधू दीनदयाळा | भक्त जनांचिया वत्सला | देई दयाळा दर्शन ॥ उठिं० ॥ ५ ॥ तंव तो राजीवलोचन | राम जगत्रयजीवन | स्वानंदरूप होवोन । दासा दर्शन दधिलें || उठिं० ॥ ॥ ६ ॥ भजन ॥ सीताराम, सीताराम, सीताराम, सीताराम.