. (भूपाळी ) राम आकाशीं पाताळीं । राम नांदे भूमंडळीं । राम योगीयांचे मेळीं । सर्वकाळीं तिष्ठत ॥ ध्रु० ॥ राम नित्य निरंतरी । राम सबाह्य अभ्यंतरी राम विवेकाचे घरीं । भक्तीवरी सांपडे ॥ राम आकाश० ॥ १ ॥ राम भावें ठायीं पडे । राम भक्तीशीं आतुडे । राम ऐक्यरूपीं जोडे । मौन पडे श्रुतीसी ॥ राम० ॥ २ ॥ राम योग्यांचं मंडण | राम भक्तांचें भूषण | राम आनंदाचा घन | करी रक्षण दासाचें ॥ राम० ॥ ३ ॥ भजन ॥ भजन करावें रामाचें । सार्थक होईल जन्माचें ॥
( भूपाळी ) जय जय सुरवरगगनायका । आत्मारामा सुख- दायका । हे चराचरी व्यापका | रविकुल तिलका सुखधामा || || उठिं उठिं कृपासागरा | प्रेमळ भक्तांच्या माहेरा | दे दर्शन जगदा- धारा । या तमतिमिरा दूर करीं ॥ जयजय० ॥ १ ॥ पूजाद्रव्य घेऊनि हातीं । द्वारीं ब्रह्मादिक तिष्ठती । कपिचे समुदाय दाटती । टाळी पिटिती आनंदें ॥ जयजय० ॥ २ ॥ पुढे अंजनीचा नंदन | लाडका कारतो लोटांगण | आले वसिष्ठ सद्गुरु जाण । आशिर्वाद घे त्यांचा ॥ जयजय० ॥ ३ ॥ गायन साहित्य घेऊन | नारद तुंबर करिती गान | प्रल्हादादिक वैष्णव जन | दर्शन तुझें इच्छिती ॥ जयजय० ॥ ४ ॥ आली कौसल्या महा तारी ॥ साथ साखर घेउनि करीं । आली बोरें घेउनि शबरी । महाद्वारीं तिष्ठतसे ॥ जय० ॥५॥ तुलसी चंदन घेउनि हातीं । आले तुलसीदास सन्मती । कमाल कबीर धांवत येती । शेला घेउनि तुजलागीं ॥ जयजय० ॥ ६॥ जे कां संतकुळीं भूषण | आले रामदास कल्याण | आला गंगाद घेऊन | बालकृष्ण तुजसाठीं ॥ जयजय० ॥ ७ ॥ भजन ॥ राम सितापती । तयाचा सेवक मारुती राजाराम ॥
(भूपाळी ) उटिं उठिंबा पाडसा | जागा होई रामदासा । म्हणे अंजनी लालता | धरुनि भाविक तिष्ठती ॥ ध्रु० ॥ पहा अरु णोदय जाहला । कपिजन राम दर्शनाला । भक्तजन राम दर्शनाला । अवघे पाचारिती तुजला | सखया बाळा जागा हो ॥ जाउँ ॥ १ ॥ जो का क्षीराधीशयन | जानकी देवीचे मंडण | राम सिंहासनि
म. म. द. बा.पोलवाय
ग्रंथ संग्रह