पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ २७ ॥ तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सजते ॥ २८ ।। प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मंदान्कृत्स्नविन विचालयेत् ॥ २९ ॥ ठेवण्याकरिता नव्हे तर उत्तम कित्ता घालून देऊन त्यांस सुधारण्यासाठी ज्ञानी पुरुषानेहि कमेच केली पाहिजेत असें भगवान् सांगत आहेत (गीतारहस्य प्र. ११. १२ पहा) असो. लोकसंग्रहार्थ आरमज्ञानी पुरुष याप्रमाणे सांसारिक कमैं करूं लागला तर तोहि अज्ञानीच बनला अशी शंका येण्याचा संभव आहे; म्हणून ज्ञानी व अज्ञानी दोधेहि संसारी बनले तरी त्यांच्या वर्तनांत फरक कोणता व अडाण्याने स्यापासून काय शिकावयाचे ते आतां स्पष्ट करून सांगतात-1 (२७) प्रकृतीच्या (सत्त्व, रज व तम या ) गुणांनी सर्व प्रकारे कमें होत असतो, अहंकाराने वेटावलेला ( अज्ञानी पुरुष) मी कर्ता असें मानितो; (२८) परंतु हे महाबाहो अर्जुना ! गुण आणि कम ही दोन्ही आपल्याहून भिम आहेत हे तत्व जाणणारा (ज्ञानी पुरुष), गुणांचा हा आपआपसांत खेळ चालला आहे असे समजून, त्यांत आसक्त होत नाही. (२९) प्रकृ- तीच्या गुणांनी वेडे झालेले लोक गुण व कम यांतच आसक्त होत असतात; अशा असर्वज्ञ व मंद लोकांस सर्वज्ञ पुरुषाने (आपल्या कर्मत्यागाने भलत्या मागास लावून) बिघवू नये. [श्लोक २६ यांतील अर्थाचाच अनुवाद येथे केला आहे. प्रकृति निराकी आणि आस्मा निराळा, प्रकृति किंवा माया सर्व काही करिते, आरमा कांडी करीत नाही. आणि ज्याने ओळखिलें तोच बुद्ध किंवा ज्ञानी झाला, त्याला कर्माचा बंध धरत नाहीं, इ. वरील श्लोकांत दिलेले सिद्धान्त मूळ कापिलसांख्यशास्त्रातले असून त्यांचे पूर्ण विवेचन