पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर वटीपा-अध्याय ३. -- - - - - -- - - - - - - - - - प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः। 'तले म्हणजे भागण्यासारखे आहे. याला उत्तर म्हणून भगवान् असे सांगतात की, सदाचरणाची ज्या लोकांना दृढ संवय लागलेली नसते (आणि सामान्य लोक याच वर्गातले असतात) त्यांना तोंडाने नुस्ते ज्ञानच सांगितले तर हे लोक आपल्या गैर वर्तनाच्या समर्थनार्थच सदर ब्रह्मज्ञानाचा दुरुपयोग करितात, व उलट "अमुक ज्ञानी पुरुष असें म्हणतो" अशा नुस्त्या चावटपणाच्या गोष्टी सांगू लागतात, अखें नेहमी दृष्टीस पडते. तसेच ज्ञानी पुरुषाने कमैं अजीबात सोडिली म्हणजे अज्ञानी लोकांना निरुद्योगी होण्यास तो एक दाखलाच होतो. लोक अशा रीतीने तर्कटी, चावट किंवा निरुधोगी होणे यालाच बुद्धिभेद असे हटले आहे; आणि लोकांच्या बुद्धीचा अशा प्रकारें भेद करणे ज्ञात्या पुरुषास योग्य नाही. म्हणून जो पुरुष ज्ञानी झाला त्याने लोक- संग्रहार्थ म्हणजे लोकांना शहाणे व सदाचरणी करण्यासाठी आपण स्वतः संसारांत राहून लोकांस निष्काम कर्माचा म्हणजे सदाचरणाचा प्रत्यक्ष धडा घालून देणे व त्यांच्याकडून स्याप्रमाणे आचरण करविणे हे त्याचे या जगांतील महत्वाचे काम आहे असा गीतेत सिद्धान्त केलेला आहे (गीतार. पृ. ४० पहा). परंतु गीतेचा हा अभिप्राय मनांत न घेता "अहाणी लोकांनी अडाणी राहूनच आपली कमें करावी म्हणून ज्ञानी पुरुषाने स्यांच्याप्रमाणे कर्मे करण्याचे सोंग आणावें," असा कित्येक टीकाकार या श्लोकाचा विपरीत अर्थ करीत असतात ! जणं काय गीता दमाचरण शिकविण्यासाठी किंवा लोकांना अडाणी ठेवून जनावराप्रमाणे त्यांच्याकडून कर्मे करून घेण्यासाठीच प्रवृत्त झाली आहे ! ज्ञानी पुरुषाने कमैं करूं नयेत असा ज्यांच्या बुद्धीचा दृढनिश्चय आहे, त्यांना लोकसंग्रह, हे एक सोंग वाटणे स्वाभाविक आहे; पण गीतेचा खरा अभिप्राय तसा नाही. लोकसंग्रह हे ज्ञानी पुरुषाच्या कामांपैकी एक महत्वाचे काम असून, लोकांना अढाणी गी.५ - -.- -. -.. -... - -