पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्रीता. $$ सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम् ॥ २५ ॥ न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् । जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥ २६ ॥ त्याची परवा न करितां सांख्यमार्गातील ज्ञानी पुरुष सर्व कर्मे सोडून देतात; आणि कर्ममार्गातील ज्ञानी पुरुष प्रतःसाठी जरूर नसली तरी लोकसंग्रह हे महत्वाचे व अवश्यक साध्य समजून त्यासाठी स्वधर्माप्रमाणे आपली सर्व कामे चालू ठेवीत असतात, हा या दोन मार्गात मोठा भेद आहे (गीतारहस्य प्रकरण ११. पृ. ३५१ पहा). भगवान् स्वतः काय करितात ते सांगितले. आता यापुढे ज्ञानी व अज्ञानी यांच्या कर्मातील भेद दाखवून अज्ञान्यास सुधारण्यासाठी ज्ञात्याने काय करणे अवश्य आहे ते सांगतात-] (२५) हे अर्जुना ! (म्हणून) लोकसंग्रह करू इच्छिणाच्या ज्ञानी पुरुषाने (व्यावहारिक) कर्मात आसक्त झालेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे पण आसक्ति सोडून वागले पाहिजे. (२६) कर्माचे ठायीं आसक्त झालेल्या अडाणी लोकांच्या बुद्धीचा ज्ञानी पुरुषाने भेद करूं नये; (आपण स्वतः) युक्त म्हणजे योगयुक्त व सर्व कम करणारा होऊन लोकांना ती खुषीने करावयास लावावें.

[अज्ञानी लोकांच्या बुर्टाचा भेद करूं नये असा या श्लोकाचा अर्थ

असून तोच अर्थ पुढे २९ च्या श्लोकांतहि पुनः सांगितला आहे. परंतु याचा अर्थ लाकांना अज्ञानांत ठेवावे असा नाही. २६ व्या श्लोकांत ज्ञानी पुरुषाने लोकसंग्रह केला पाहिजे असे सांगितले आणि लोकसंग्रह म्हणजेच लोकांना शहाणे करून सोडणे असा अर्थ आहे. पण यावर कोणी अशी शंका घेईल की, लोकसंग्रह जरी कर्तव्य असला तरी त्यासाठी ज्ञानी पुरुषाने स्वतः कम करण्याची जरूर नाही. लोकांना ज्ञान सांगि