पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. न में पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥ यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतंद्रितः । मम वर्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥ उत्सीदेयुरिमे लोका न कुयी कर्म चेदहम् । संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥ 'आत्मज्ञानी संन्यासी' असा अर्थ नाहीं (गी. ५. २ पहा). आत्म- ज्ञानी पुरुषाची स्वार्थबुद्धि सुटली तरी लोककल्याणाची कम त्यास सुटत नाहीत हाच अर्थ स्वतःचे उदाहरण सांगन भगवान आतां अधिक दृढ करितात- (२२) हे पार्थी! (असे पहा की,) माझे ( म्हणून ) त्रिभुवनांत (मला) काहीहि कर्तव्य (उरलेले) नाही; किंवा अप्राप्त अशी एखादी वस्तु मिळवावयाची (राहिलेली)नाही: तथापि मी कर्मेच करीत आहे (२३) कारण, मी जर कदाचित् कर्माच्या ठायीं आळस सोडून वर्तणार नाही तर सर्व मनुष्य हे पार्था ! सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतील. (२४) मी कर्म न केले तर हे लोक उत्सन्न म्हणजे नष्ट होतील, मी सकर करणारा होईन व या प्रजाजनांचा माझ्या हातून घात होईल. 3 [लोकसंग्रह म्हणजे उगाच काही तरी थोतांड नव्हें, है भगवंतांनी स्वत:च्या उदाहरणाने या लोकांत फार चांगल्या रीतीने स्पष्ट करून दाखविले आहे. तसेच ज्ञान प्राप्त झाल्यावर ज्ञास्याचे जरी काही कर्तव्य उरले नसले तरीहि सर्व कर्म निष्काम बुद्धीने त्यानं अवश्य केले पाहिजे, असा जो आम्ही १७ ते १९ श्लोकांचा वर अर्थ केला आहे तोहि भगवंताच्या स्वतःच्या या दृष्टान्तावरून पूर्णपणे सिद्ध होतो. किंबहुना एरवी हा दृष्टान्तच विलग व निरर्थक होईल (गी. र. पृ. ३२० पहा). यज्ञचक्र बुडून जगाचे काही होवो - - - - - - - - - - - - - - - - -