पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥२१॥ दुसया चरणापासून सुरुवात झाली आहे. "लोकसंग्रह मेवापि" यांतील ' एवापि' या पदांचे तात्पर्य हेच असून यावरून निराकया प्रकारच्या प्रतिपादनास आता सुरुवात झाली आहे असे स्पष्ट होते. 'लोकसंग्रह ' या शब्दांत 'लोक' याचा अर्थ व्यापक असून केवळ मनुष्यज्ञातासच नव्हे, तर सर्व जगाला सन्मार्ग लावून, त्याचा नाश न होऊ देतां, संग्रह म्हणजे चांगल्या रीतीने धारण, पोषण, पालन किंवा बचाव करणे, या सर्व गोष्टींचा लोकसंग्रह शब्दांत समावेश हातो. इत्यादि गोष्टींचा गीतारहस्याच्या अकराव्या प्रकरणांत (पृ. ३२६- ३३४) आम्ही सविस्तर विचार केला असल्यामुळे त्याची येथें पुनरुक्ति करीत नाही. लोकसंग्रह करण्याचे हे कर्तव्य किंवा अधिकार ज्ञानी पुरुषाकडे कां येतो ते प्रथम सांगतात--] (२१) श्रेष्ठ (म्हणजे आत्मज्ञानी कर्मयोगी) पुरुष जे जे करितो से तेच इतर म्हणजे सामान्य लोक करीत असतात. तो जी गोष्ट प्रमाण म्हणून अंगीकारितो तिलाच लोक अनुसरतात. तैत्तिरीयोपनिषदांतहि प्रथम 'सत्यं वद,धर्म चर' इ. उपदेश केल्यावर अखेर-"संसारांत एखाद्या प्रसंगी कसे वागावे याचा तुला संशय पडल्यास ज्ञानी, युक्त व धर्मिष्ट ब्राह्मण त्या बाबतीत जसे वागत असतील त्याप्रमाणे वागत जा" असे सांगितले आहे. (ते. १. १७.४); आणि याच अर्थाच। एक श्लोक नारायणीय धर्मातहि आलेला आहे (म. भा. शां. ३४१.२५). मराठीत “ जसा वर्ततो लोककल्याण- कारी । जगीं वर्तती सर्वही त्या प्रकारी ।।" असा जो समर्थाचा श्लोक आहे तो याच श्लोकाचे भाषान्तर आहे. समर्थांचा हा लोककल्याणकारी पुरुष म्हणजेच गीतेतील 'श्रेष्ट' कर्मयोगी होय. श्रेष्ठ या शब्दाचा