पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. ६९ इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यशभाविताः ॥ तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ॥ १२ ॥ (दोघेहि) परम श्रेय ह्मणजे कल्याण प्राप्त करून घ्या." (१२) कारण, यज्ञाने संतुष्ट झालेले देव इच्छिलेले (सर्व) भोग तुम्हांला देतील. त्यांनी दिलेले स्यांना (परत) न देतां जो (केवळ स्वतःच) उपभोगितो तो खरो- खरच चोर होय. - - - - - - - - - [ब्रह्मदेवाने ही सृष्टि म्हणजे देवादि सर्व लोक निर्माण केल्यावर या लोकांचे पुढे धारणशेषण कसे होईल अशी त्यास चिंता पहली. तेव्हा हजार वर्षे तप करून त्याने भगवानास संतुष्ट केल्यावर भगवं. तांनी या लोकांच्या धारणासाठी प्रवृत्तिपर यज्ञचक्र निर्माण केले आणि देव व मनुष्ये या दोघांस त्याप्रमाणे वर्तन करून एकमेकांचे रक्षण करण्यास सांगितलें, असें महाभारतातील नारायणीय धर्मांत वर्णन असून त्याचाच वरील लोकांत थोड्या फरकाने व शब्दभेदामें अनुवाद केलेला आहे (म. भा. शां. ३४०.३८ ते ६२ पहा). यावरून प्रवृत्तिपर भागवतधर्माचे तत्वच गीतेत प्रतिपाद्य आहे, हा सिद्धान्त आधिक दृढ होतो. पण भागवतधर्मात यज्ञातील हिंसा गर्दा मानिली असल्यामुळे (म. भा. शां. ३३६ व ३३७ पहा), पशुयज्ञाऐवजी प्रथम द्रव्यमय यज्ञ सुरू होऊन, अखेर जपमय किंवा ज्ञानमय यज्ञच सर्वात श्रेष्ठ, हे मत पुढे प्रचारांत आलेले आहे (सी. ४. २३-३३). यज्ञ म. चातुर्वण्याची सर्व कम होत, आणि सामाजाचे योग्य धारणपोषण होण्यास ही यज्ञकमैं किंवा यज्ञ चक्र नेहमी सुरळीत चालू पाहिजे हैं उघड आहे (मनु. १.८७ पहा), किंबहुना पुढे विसाव्या श्लोकांत वर्णिलेल्या लोकसंग्रहाचें यज्ञचक्र हे एक स्वरूप आहे. (गीतार. प्र. ११ पहा). म्हणून देवलोक व मनुष्यलोक या दोहोंच्याहि संग्रहार्थ भगवंतांनीच प्रथम निर्माण केलेले - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -