पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अनेन प्रसविष्यध्वमेष घोऽस्त्विष्टकामधुक् ॥१०॥ देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ११ ॥ अध्यायांतील २३ व्या श्लोकांत पुनः प्रतिपादन केला आहे. तात्पर्य यज्ञार्थ कमें कराची, कारण ती बंधक होत नाहीत, "या मीमांसकांच्या सिद्धान्तांताचा " यज्ञार्थ जी कमें करावयाची तीहि फलाशा सोडून करावी," अशी भगवद्गीतने जास्त भर घालून दुरुस्ती केली आहे. पण यावरहि अशी शंका येते की, मीमांसकांच्या सिद्धान्तांत याप्रमाणे दुरुस्ती करण्याचा खटाटोप करून यज्ञयामादि गाईस्थ्यवृत्ति चालू ठेव- ण्यापेक्षा कर्माच्या दगदगीतून सुटून मोक्षमाप्ति होण्यास सर्व करें सोडून संन्यास घेणे बरे नव्हे काय ? नाही; असें भगवद्गीतेचें या प्रश्नास साफ उत्तर आहे. कारण यज्ञचक्राशिवाय जगाचे व्यवहार चालावयाचे नाहीत. किंबहुना जगाच्या धारणपोषणार्थ हे चक्र ब्रह्मदेवाने प्रथम उत्पन्न केले आहे; आणि जगाची सुस्थिति किंवा संग्रहच ज्या अर्थी भगवंतास इष्ट आहे, त्या अर्थी हैं यज्ञचक कोणासहि सोडिता येत नाही आणि आता हाच अर्थ पुढील श्लोकांतून वर्णिला आहे. 'यज्ञ' शब्द केवळ श्रौत यज्ञापुरताच या ठिकाणी वापरला नसून त्यांन स्मार्त यज्ञांचा आणि चा तुवादि यथाधिकार सर्व व्यावहारिक कर्माचा समावेश होतो, हे या प्रकरणी वाचकाने नेहमी लक्षात ठेविले पाहिजे.] (१०) पूर्वी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव (त्यांस) म्हणाला की, " या (यज्ञाच्या) योगाने तुम्ही वृद्धि पावा. हा तुमची कामधेनु म्ह. इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. (११) या यज्ञाने देवांची तुम्ही संभा- वना म्हणजे समृद्धि करीत जा; (व) ते देव (उलट) तुमची संभावना म्हणजे समृद्धि करोत. (याप्रमाण) परस्परांची संभावना करीत होरसाते