पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ३. ६७ सहयज्ञाः प्रजाः सृथ्वा पुरोवाच प्रजापतिः । होऊ शकत नाही. पण यज्ञाखेरीज इतर कामासाठी, उदाहरणार्थ केवळ स्वतःच्या पोटासाठी मनुष्य जे काही करील तें कर्म यज्ञार्थ होत नसून केवळ स्वतः पुरुषाच्याच फायद्याचे होते. म्हणून मीमांसक त्यास 'पुरु. पार्थ कर्म असे म्हणतात, व अशा म्ह० यज्ञार्याखेरीज दुसन्या, अर्थात् पुरुषार्थ कर्माचे जे जे काही बरेवाईट फल असेल ते पुरुषाला भोगिले पाहिजे, असें मीमांसकांनी ठरविले आहे; व हाच सिद्धान्त वरील श्लोकाच्या पहिल्या ओळीत - दिला आहे (गीतारहस्य प्र. ३ पृ. ५३- ५६ पहा). यज्ञ म्हणजे विष्णु असा गौण अर्थ करून यज्ञार्थ म्हणजे विष्णुप्रीत्यर्थ किंवा परमेश्वरार्षणपूर्वक असा जो अर्थ टीकाकार करितात तो आमच्या मते ओढाताणीचा व क्लिष्ट आहे. परंतु यज्ञासाठी जी कम करावी लागतात त्यांखेरीज दुसरे काही एक न केले तर मनुष्य कर्मबंधां- तुन सुटला काय ? असा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो, कारण यज्ञ है तरी कर्मच आहे व त्याचे स्वर्गप्राप्तिरून जे शास्त्रोक्त फल आहे ते मिळाल्या. खेरीज रहात नाही. पण स्वर्गप्राप्तिरूप है फल मोक्षप्रारतीला विरुद्ध आहे, असें गीतेच्या दुसऱ्याच अध्यायांत स्पष्ट सांगितले आहे (गी.२.४०- ४४ व ९.२०,२१ पहा). म्हणून यज्ञार्थ सुद्धा गृहस्थाने जे नियत कर्म करावयाचे तेहि फलाशा सोडून म्हणजे केवळ कर्तव्य म्हणून करावें असें वरील श्लोकाच्या दुसज्या चरणांत पुन: विधान केले आहे व तोच अर्थ पुढे सात्विक यज्ञाची व्याख्या देतांना प्रतिपादिला आहे (गी. १७. ५१ व १८.६ पहा). अशा प्रकारे सर्व कम यज्ञार्थ, आणि तीहि फलाशा सोडून केली म्हणजे, (१) ती यज्ञार्थ केली असल्यामुळे मीमांसकांच्या न्यायानेच इतर कोणत्याहि प्रकारे बंधक होत नाहीत; आणि (२) फलाशा सोडून केलेली असल्यामुळे त्याचे स्वर्गमाप्तिरूप शास्त्रोक्त पण अनित्य फलहि न मिळतां मोक्षप्राप्ति होते. असा या श्लोकाचा भावार्थ आहे व तोच अर्थ पुढे १९ व्या श्लोकांत आणि ४ थ्य • • - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -