पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः । तदर्थ कर्म कोतेय मुक्तसंगः समाचार ॥९॥ कल्याण होऊन त्याला सुख व्हावे या हेतूने सांगितलेली आहेत, पण मागे दुस-या अध्यायांत (गी. २.४१-४४) मीमांसकांची ही सहेतुक किंवा काम्य कमै मोक्षाला प्रतिबंधक, अतएव हलक्या प्रतीची असा सिद्धान्त केला आहे. आणि आतां तर तीच कर्मे करावी असे प्राप्त झाले ह्मणून या कर्माचा शुभाशुभ लेप किंवा बंधकत्व, नाहीशी होऊन, ती करीत असताहि नष्कावस्था कशी प्राप्त होते याचे पुढील श्लोकांतून विस्तृत विवेचन केले आहे, व ते सर्व भारतांत वर्णिलेल्या नारायणीय किंवा भागवत धर्मास अनुसरून आहे (म. भा. शां. ३४० पहा). (९) यज्ञासाठी जे कर्म करितात त्याखेरीज इतर कर्माने हा लोक बोधिलेला आहे. तदर्थ म्ह० यज्ञार्थ (करावयाचे) कर्म (देखील)तूं आसक्ति किंवा फलाशा सोडून करीत जा. • [या श्लोकाच्या पहिल्या चरणांत मीमांसकांचा व दुसन्यांत गीतेचा सिद्धान्त सांगितला आहे. मीमांसकांचे असे म्हणणे आहे की, यज्ञया- गादि में ज्या अर्थी बेदानेच प्रत्येकाच्या मागे लावन दिली असन ईश्वरनिर्मित सृष्टीचे व्यवहार चालण्यास हे यज्ञचक्र अवश्य आहे. त्या अर्थी ही कमैं कोणासहि सोहितां येत नाहीत; सोडील तर श्रौत धर्मास मुकला म्हणून समजावे. पण प्रत्येक कर्माचे फल मनुष्यास भोगणें जरूर आहे असा कर्मविपाकप्रक्रियेचा सिद्धान्त आहे; ब स्याप्रमाणे यज्ञासाठी जें जें कर्म करील त्याचेहि बरेवाईट फल मनुष्यास भोगणे जरूर आहे असे प्राप्त होते. मीमांसकांचे याला असे उत्तर आहे की, 'यज्ञ' करावे अशी वेदाचीच आज्ञा असल्यामुळे यज्ञार्थ जे जे कर्म करावे लागेल ते ईश्वरासच संमत असल्यामुळे ते कर्म कास धंधक - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -