पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । स्थित्वास्यामंतकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ।। ७२ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥ (७२) हे पार्था ! ब्राह्मी स्थिति (म्हणतात ती) हीच. ही प्राप्त झाल्यावर कोणीहि मोहांत पडत नाही; आणि अंतकाळी म्हणजे मरणाच्या वेळी सुद्धा या स्थितीमध्ये राहून त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मांत मिळून जाण्याच्या स्वरूपाचा मोक्ष मिळतो. 3 [ब्राह्मी स्थिति ही कर्मयोगांतील शेवटची व अत्युत्तम स्थिति होय (गी. र.प्र. ९ पृ. २३० व २४७ पहा.); व ती प्राप्त झाली म्हणजे पुन: माह होत नाही हा त्यांतील विशेष आहे. हा विशेष येथे सांग- ण्याचे कारण असे की, एखाद्या मनुष्याला एखादे दिवशी घटकाभर ब्राह्मी स्थितीचा कदाचित् अनुभव येऊ शकला तरी त्यापासून काही कायमचा फायदा होत नाही. कारण कोणत्याहि मनुष्याची मरतेवेळी जर ही स्थिति नसेल, तर मरणसमयीं मनांत असलेल्या वासनेप्रमाणे पुढे पुनर्जन्म होणे 2ळत नाही (गीतारहस्य पृ. २८५ पहा ). म्हणून ब्राझी अवस्थेचे वर्णन करितानां या श्लोकांत 'अन्तकालेऽपि' अंत- काली सुद्धा स्थितप्रज्ञाची ही अवस्था कायम रहारये असे मुद्दाम म्हटलेले आहे. अंतकाली मन शुद्ध असण्याची विशेष अवश्यकता उप- निषदांतून (छां, ३. १४.१; प्रश्न. ३.१०) आणि गोतेतहि पुढे (गी. ८, ५-१०) वर्णिली आहे. वासनात्मक कर्म हे पुढे अनेक जन्म मिळ- ण्याचे कारण असल्यामुळे निदान मरणसमयीं तरी वासना शून्य झाली पाहिजे हे उघड आहे. आणि ती मरणसमयीं शून्य होण्यास पूर्थी तसा अभ्यास पाहिजे हेहि मग अर्थतःच प्राप्त होते. कारण, वासना शून्य