पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ १९ ॥ अपूर्यमाणमचलप्रतिष्टं समुद्रमापः प्रविशन्ति यद्धत् । तद्वत्कामा यं प्रविशन्ति स स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥७॥ नाही ह्मणाजे स्याबद्दल दृद्ध उद्योगह होत नाही, आणि मग शांति व सुखहि नाही असा अर्थ आहे तथापि इंद्रियनिग्रह ह्मणजे इंद्रिये अजी- बात मारून सर्व कर्म अजीबात सोडणे असा अर्थ नसून, ६४ व्या श्लोकांत वर्णिल्याप्रमाणे निष्काम बद्धि ने कमैं करावी असा गीतेचा अभिप्राय आहे. हे गीतारहस्याच्या चवध्या प्रकरणांत दाखविले आहे. ] (६९) सर्व लोकांना जी रात्र तथं स्थितप्रज्ञ जागृत असतो आणि सर्व प्राणिमात्र जेथें जाग्रत असतात तेथें या ज्ञानवान पुरुषास रात्र चाटत असते. । विरोधाभासात्मक वर्णन अलंकारिक आहे. अज्ञान ह्मणजे अंध- कार आणि ज्ञान झणजे प्रकाश होय (गी. १४, ११). अज्ञानी लोकांना जे नकोसे वाटते झणजे त्यांना जो अंधकार, तें ज्ञान्याला हवे असते; आणि अज्ञानी लोक ज्यांत गुंतलेले असतात, त्यांना जेथे उजेड-तेथे ज्ञान्याला अंधकार र ते ज्ञान्याला नको असते, असा अर्थ आहे. उदाहरणार्थ ज्ञानी पुरुष काम्य कमैं तुच्छ मानितो तर त्यांतच सामान्य लोक राबत असतात आणि ज्ञानी पुरुषाला जे निष्काम कर्म पाहिजे ते इतरांस नको असते.] (७०) चोहोकडून (पाण्याने) भरत जात असतांहि ज्याची मर्यादा चळत नाही, अशा समुद्रात सर्व पाणी ज्याप्रमाणे शिरत असते तद्वत् ज्या पुरुषांत सर्व विषय (स्याची शान्ति न मोलिता) प्रवेश करितात, त्यालाच (खरी) शान्ति मिळते. विषयाची इच्छा धरणाच्याला (ही शान्ति मिळणे शक्य)नाही.