पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २.


नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना। न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥६६ ।। इंद्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते । तदस्य हरति प्रशां वायु वमिवांभसि ।। ६७ ॥ तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः । इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तत्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८ ॥ सहि पाहिजेत; पण गीतेतील स्थितप्रज्ञ कर्माचा संन्यास न करिता लोकसंग्रहार्थ सर्व कसे निष्काम बुद्धीने करीत असतो, आणि दुसरा करीत नाही हा या दोहोंत महत्वाचा भेद आहे (गी. ३.२५ पहा). पण हा भेद गौण समजुन गीतेवरील संन्यासमार्गाच टीकाकार स्थितप्रज्ञाचे वरील वर्णन संन्यासमार्गाचेत्र आहे असें संप्रदायाच्या आग्रहाने प्रति- पादन करीत असतात. असो; ज्यांचे चित्त याप्रमाणे प्रसन्न नाही त्याचे वर्णन करून स्थितप्रज्ञाचे स्वरूप आतां अधिक व्यक्त करितात-] (६६) जो पुरुष युक्त म्हणजे वरील प्रकारे योगयुक्त झालेला नाही स्याला (स्थिर) बुद्धि आणि भावना म्हणजे दृढद्धि रूप निष्ठाहि नसत. ज्याला भावना नाही त्याला शान्ति नाही, आणि ज्याला शान्ति नाही त्याला सुग्ख तरी कोठून मिळणार ? (६७) (विषयांत) संचरणाऱ्या हागजे पागणा-या इंद्रि- यांच्या मागोमाग मन जे जाऊ लागते तेंच-पाण्यांत नौकेस जसा वारा स्याप्रमाणे-पुरुषाची बुद्धि हरण करीत असते. (६८) ह्मणून हे महाबाहो अर्जुना! इंद्रियांच्या विषयांपासून ज्याची इंद्विये सर्व बाजूंनी आंवरून धरिलेली (असतात) स्याचीच बुद्धि स्थिर झाली (ह्मणावयाची). । [सारांश, मनोनिग्रहद्वारा इंद्रियनिग्रह हा सर्व साधनाचे मूळ होय. इंद्रिये विषयांत व्यग्र होऊन सैरावैरा धांवत असली झणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची ( वासनात्मक) बुद्धिच होऊ शकत नाही. बुद्धि