पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ श्रीमद्भगवद्गाता. सगात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ १२ ॥ क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशावुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३ ॥ रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिद्रियैश्चरन् । आत्मवश्यैविधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४ ॥ प्रसाद सर्वदुःखाना हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसो हाशु बृद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५ ।। (६२) विषयांचे चिंतन करणान्या पुरुषाचा सदर विषयांचे ठिकाणी संग म्हणजे सलगी वाढत जात्ये. या संगापासून पुढे काम म्हणजे सदर विषय आपल्याला पाहिजेत ही वासना उत्पन्न होत्ये; आणि (हा काम तृप्त होण्यास अडथळा झाला म्हणजे ) त्या कामापासूनच क्रोधाचा उद्रव होतो; (६३) क्रोधापासून संमोह म्ह० अविवेक होतो, संमोहापासून स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रंशापासन बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशापामन (पुरुषाचा) सर्वस्वीं घात होतो. (६४)पण आपला आत्मा म्हणजे अंतःकरण ज्याच्या ताब्यांत आहे तो (पुरूप)प्रीति व द्वेश यांपासून सुटलेल्या व आपल्या स्वाधीन अस- लेल्या इंद्रियांनी विषय यांमध्ये वागूनहि (चित्ताने) प्रसन्न असतो. (६५) चित्त प्रसन्न असले झणजे त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. कारण ज्याचे चित्त प्रसन्न त्याची बुद्धीहि तत्काल स्थिर होत्ये. । [या दोन श्लोकांत विषय अगर कम न सोडितां फक्त त्यामधल्फ संग सोडून स्थितप्रज्ञ विषयांतच निःसंगबुद्धीने वागत असतो व त्याला जी शान्ति मिळत्ये ती कर्मत्यागामुळे नसून फलाशेच्या त्यागामें प्राप्त होत्ये असे स्पष्ट वर्णन आहे हे लक्षात ठेविले पाहिजे. कारण, याखेरीज इतर बाबतीत हा स्थितप्रज्ञ आणि संन्यासमार्गातील स्थितप्रज्ञ यांत काही भेद नाही. इंद्रियसंयमन, निरिच्छपणा व शांति हे गुण दोघां-