पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५. श्रीमद्भगवद्गाता. अर्जुन उवाच । $$ स्थितप्रशस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४॥ श्रीभगवानुवाच । प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रशस्तदोच्यते ॥ ५५ ॥ दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६ ।। समाधि कर; म्हणजे साम्यबुद्धिरूप कर्मयोग तुला प्राप्त होऊन जास्त उपदेशाचीहि जरूर न पडतां कर्मे करूनहि स्यांचे पाप लागणार नाही अशा रीतीने ज्या कर्मयोग्याची बुद्धि किंवा प्रज्ञा स्थिर झाली त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात व त्याचे वर्तन कसे असते असा आतां अर्जु- नाचा प्रश्न आहे.] अर्जुन म्हणाला-(५४) हे केशवा ! समाधिस्त स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे ? स्या स्थितप्रज्ञाचे बोलणे, बसणे व वाचणे कसे असते ? (तें मला सांगा). । [या श्लोकांत 'भाषा' हा शब्द 'लक्षण' या अर्थी योजिलेला आहे व त्यांतील भाष धातूला अनुसरून "कोणाला म्हणावे" असे त्याचे आम्ही भाषांतर केले आहे. स्थितप्रज्ञाचे वर्तन महणजे कर्म योगशास्त्राचा पाया होय हे गीतारहस्याच्या बाराव्या प्रकरणांत (पृ. ३६४-३७६) स्पष्ट करून दाखविले आहे, व त्यावरून पुढील वर्णनाचे महत्त्व कळून येईल.] श्रीभगवान् म्हणाले--(५५) हे पार्थ ! मनांतील सर्व काम म्हणजे वासना जेव्हां सोडितो व आपण आपल्या ठायींच संतुष्ट होऊन रहातो, त्याला स्थितप्रज्ञ ह्मणतात. (५६)दुःखात ज्याच्या मनाला खेद होत नाही,