पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. जन्मबंधविनिमुक्ताः पदं गच्छंन्त्यनामयम् ॥ ५१ ॥ यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरि यति। तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रु तस्य च ॥५२॥ श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला। समाधायचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ।। ५३ ॥ (५१) (समत्व) बुद्धीने ज्ञानी पुरुष युक्त झाले म्हणजे कम- फलाचा त्याग केल्याने (ते) जन्माच्या बंधनापासून मुक्त होरसाते (पर- मेश्वराच्या) दुःखविरहित पदाला जाऊन पोचतात. (५२) जेव्हां तुझी बुद्धि मोहाच्या गढुळ आवरणांतून पार पडेल तेव्हा जें ऐकिलें असेल ते, आणि जे काय ऐकावयाचे असेल ते, या दोहोंचाहि तुला कंटाळा येईल. [म्हणजे जास्त काही ऐकावयास नको असे वाटेल. कारण या गोष्टी ऐकण्यापासून जे काय फल मिळावयाचे ते, तुला आधीच प्राप्त झालेले असेल. 'निवेद' हा शब्द प्रायः संसाराबद्दलच्या कंटाळ्यास किंवा वैराग्यास लावितात. या श्लोकांत त्याचा अर्थ सामान्यतः "कंटाळा" किंवा " नकोसे होण" एवढाच विवक्षित आहे. हा कंटाळा विशेषेकरून मागे सांगितलेल्या त्रैगुण्यविषयक श्रोतकर्माबद्दलचा आहे, असे पुदील श्लोकावरून दिसून येईल.] (५३) (नाना प्रकारच्या) वेदवाक्यांनी गांगरून गेलेली तुझी बुद्धि जेव्हां समाधि वृत्तीत स्थिर व निश्चल होईल, तेव्हां (हा साम्यबुद्धिरूप) योग तुला प्राप्त होईल.

[सारांश, पूर्वी २.४४ यांत सांगितल्याप्रमाणे वेदवाक्यांतील फल.

श्रुतीला भुलून जाऊन अमक्यासाठी म्हणून अमुक कर्म कर अशा प्रका- रच्या खटाटोपांत पडल्याने वृद्धि स्थिर न होता ती अधिक गांगरून जास्ये. म्हणून अनेक उपदेश ऐकण्याच हे काम सोडून चित्ताची निश्चल - - - - - - - - -- - - - ..